मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
इंचगाव (ता. मोहोळ) येथील टोल नाका परिसरातील स्थानिक नागरिकांना रक्कम भरून वाहन टोल सवलतीचे दिले जाणारे पास वाहनधारकांच्या सोयीने मिळावेत, अशी मागणी मंगळवेढा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. राहुल घुले यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत माहिती अशी, की सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील इंचगाव (ता. मोहोळ) येथे टोल नाका आहे. या टोल नाका ते मंगळवेढा शहराचे अंतर अठरा किलोमीटर आहे.
या अंतरापर्यंत स्थानिक नागरिकांच्या वाहनांसाठी सवलतीच्या पासद्वारे लाभ दिला जातो. परंतु टोल प्रशासनाने वाहनधारकांना हे पास दर महिन्याच्या एक तारखेलाच घेऊन जाण्याचे बंधन लादले आहे.
यामुळे वाहनधारकांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहन धारकांना एक तारखेला टोल सवलतीचा पास काढणे शक्य होत नाही.
यामुळे वाहनधारकांना पास अभावी टोलसाठी अधिक रक्कम भरावी लागत असल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग व टोल प्रशासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करून एक तारखेशिवाय अन्य दिवशीही वाहन धारकांच्या सोयीने सवलत पास उपलब्ध करावेत;
अन्यथा मंगळवेढा तालुका काँग्रेसच्या वतीने इंचगाव येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अॅड. राहुल घुले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज