mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापरे..! संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 15, 2025
in क्राईम, राष्ट्रीय
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

जावयाने सासूची हत्या करून तिच्या शरीराचे १९ तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यात ही घटना घडली. जावयाने ज्याठिकाणी सासूची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे फेकून दिले त्याठिकाणी सीसीटीव्ही नव्हते.

त्यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचणं अवघड जात होते. पण अखेर पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या. महत्वाचे म्हणजे आरोपी डॉक्टर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी बंगळुरूपासून ११० किमी अंतरावर असलेल्या कोराटगेरे येथील चिंपुगनहल्लीमध्ये तोंडात माणसाचा हात घेऊन एक कुत्रा फिरताना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध सुरू केला.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2025/08/VID-20250810-WA0044.mp4

सुरूवातीला पोलिसांना त्या परिसरात काहीच सापडले नाही. पण बराच तपास केल्यानंतर पाच किलोमीटरच्या परिघात १९ वेगवेगळ्या ठिकाणी मानवी शरीराचे तुकडे पोलिसांना सापडले.

पण डोकं सापडले नव्हते. पोलिसांनी शरीराचे तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले तेव्हा असे आढळून आले की एका महिलेची हत्या करून शरीराचे तुकडे करण्यात आले होते.

मृतदेह महिलेचा असल्याचे समजले पण ती महिला कोण होती? तिची ओळख पटवणे कठीण झाले होते. तपासात पोलिसांना मृतदेहाच्या तुकड्यासोबत दागिने देखील सापडले होते. त्यावरून हत्या चोरीच्या उद्देशाने केली नसल्याचे उघड झाले.

त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या पोलिस ठाण्यात बेपत्ता महिलांची यादी शोधून काढली. तेव्हा पोलिसांना कळाले की बेल्लवेमध्ये राहणारी ४२ वर्षीय बी.लक्ष्मीदेवीउर्फ लक्ष्मीदेवम्मा ३ ऑगस्टपासून बेपत्ता आहे. लक्ष्मीदेवम्माच्या नवऱ्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

लक्ष्मीदेवम्माच्या नवऱ्याने पोलिसांना सांगितले होते की, लक्ष्मीदेवम्मा शेवटी मुलगी तेजस्विनीच्या घरी हनुमंतपुराला गेली होती त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती आणली तेव्हा कोराटागेरे येथे महिलेचं डोकं सापडलं.

हे डोकं आपल्या बायकोचे असल्याचे लक्ष्मीदेवम्माच्या नवऱ्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी क्राईम सीन क्रीएट करून अंदाज लावला की महिलेची हत्या प्लानिंग करून केली. तिची हत्या करणारी व्यक्ती ओळखीमधीलच असेल.

त्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली. पोलिसांना माहिती मिळाली की ३ ऑगस्टला एक पांढऱ्या रंगाची कार हनुमंतपुराला आली होती. ही कार कोराटागेरेच्या दिशेने गेली होती. या कारच्या मागे आणि पुढच्या बाजूला वेगवेगळी नंबर प्लेट होती.

याद्वारे आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या कारचा शोध घेतला असता ती एका शेतकऱ्याची निघाली. त्यानंतर पोलिसांनी या शेतकऱ्याला फोन लावला असता त्याचा फोन ३ ऑगस्टपासून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याची कसून चौकशी केली.

त्याने पोलिसांना सांगितले की ही कार ६ महिन्यापूर्वीच डॉ.रामचंद्रया याला विकली होती. हा डॉक्टर हत्या करण्यात आलेल्या लक्ष्मीदेवम्माचा जावई असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टराला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

सासूची हत्या करण्यासाठी त्याने ४ लाखांची सुपारी दिली होती. सासू सतत आपल्या संसारात ढवळाढवळ करत असल्यामुळे जावयाने तिची हत्या केली असल्याचे तपासातून उघड झाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सासूची हत्या

संबंधित बातम्या

नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! वैद्यकीय पदवी नसताना उपचार; दोन बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल; तालुका आरोग्य विभागाची कारवाई

August 18, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील वाळू माफिया व सराईत गुन्हेगाराला ‘एमपीडीए’ कायद्याखाली येरवडामध्ये स्थानबद्ध; पंढरपूर पोलिसांची कारवाई

August 17, 2025
मंगळवेढ्यात मासे धरण्यासाठी गेलेला कॉलेजकुमार पाण्यात गेला वाहून, रेस्क्यू टीमला पाचारण; शोधकार्य सुरु

पती-पत्नीमधील वादामुळे अख्खं कुटुंब संपलं! बायको नांदायला येत नसल्याने बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलले, स्वतःही संपला; एकाच विहिरीत पाच मृतदेह

August 17, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

August 16, 2025
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोनेप्रेमींचे टेन्शन वाढणार! दागिने खरेदी करायचंय? मग आत्ताच करा; भविष्यातील संकेत पाहूनच धडकी भरेल…

August 15, 2025

खळबळ! कमी किमतीमध्ये सोने खरेदीचा मोफ एका महिलेला चांगलाच आला अंगलट; मंगळवेढ्यात धमकी देऊन 2 लाख लुटले; महिला हॉटेल चालकासह दोघांना लुटले

August 14, 2025
मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

पिक्चर अभी बाकी है..! व्होट चोरीवरुन राहुल गांधींचा भाजपला इशारा; गांधींच्या प्लॅनने वाढवलं भाजपचं टेन्शन?

August 13, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामगिरी! भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे सांगितले आकडे…

August 14, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; व्यापाऱ्याने चिटी लिहून संपवले जीवन; तर  खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळलेल्या मंगळवेढ्यातील तरुणाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

August 11, 2025
Next Post
सुवर्ण शिखराकडे एक पाऊल पुढे! सुवर्णरत्न मल्टीस्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयाचा आज सिध्दापुरात भव्य उद्घाटन सोहळा; १३ वर्षांचा यशस्वी प्रवास; सेवा आणखी जलद व आधुनिक होणार

सुवर्ण शिखराकडे एक पाऊल पुढे! सुवर्णरत्न मल्टीस्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयाचा आज सिध्दापुरात भव्य उद्घाटन सोहळा; १३ वर्षांचा यशस्वी प्रवास; सेवा आणखी जलद व आधुनिक होणार

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

धाकधूक वाढली! उजनीतून भीमा नदीत ‘इतक्या’ हजार क्युसेक तर वीर धरणातून ४७ हजार क्युसेकचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

August 20, 2025
कोरोनामुक्त झालेले अमित शहांची तब्येत बिघडली, रात्री उशिरा एम्समध्ये दाखल

पतसंस्थांमध्ये अडकलेले पैसे वेळेत परत मिळवून देऊ; घोटाळेबाज सहकारी संस्थांवर अवसायक नियुक्त; सहकारमंत्री अमित शाह

August 20, 2025
नुतन उपविभागीय पाेलीस आधिकारी म्हणून डॉ.बसवराज शिवपुजे यांनी घेतला पदभार; मंगळवेढ्यातील जुगार अड्डे, अवैध वाळू, दारू रोखण्याचे असणार आवाहन

खबरदार! नियमभंग करणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई, ‘हे’ साहित्य जप्त करणार; प्रत्येक गणेश मंडळाला एक पोलिस, एक होमगार्ड दत्तक; DYSP डॉ.बसवराज शिवपुजे यांची माहिती

August 20, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

मोठी बातमी! पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणूका ‘या’ महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या

August 20, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातल्या जनतेला मोठं गिफ्ट, मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय; राज्यातील ‘या’ विभागाचा चेहरामोहरा बदलणार

August 20, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण भरले ‘एवढे’ टक्के; मुसळधार पावसामुळे उजनीतून दोन महिन्यात सोडले ६३ टीएमसी पाणी; धरणात दौंडवरून आवक सुरूच

August 19, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा