मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
गेल्या तब्बल २७ वर्षांपासून कोर्टात खटला सुरू असतानाही न्याय न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीने पुण्यातील जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव नामदेव जाधव असून ते पुण्यातील वडकी भागात राहत होते. जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादासंदर्भात त्यांची केस पुणे जिल्हा न्यायालयात गेल्या २७ वर्षांपासून प्रलंबित होती.
मात्र, इतक्या वर्षांच्या सुनावणीनंतरही न्याय मिळत नसल्याने आणि प्रकरणात काहीही निकाल लागत नसल्याने ते अत्यंत नैराश्यात होते. आज सकाळी नामदेव जाधव न्यायालयात हजर झाले होते.
मात्र, काही वेळानंतर त्यांनी अचानक कोर्टाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.
प्राथमिक चौकशीतून हे स्पष्ट झाले आहे की, न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे आणि खटला दीर्घकाळ चालत राहिल्याने जाधव मानसिक तणावाखाली होते.
‘२७ वर्षांपासून न्यायालयाचे चक्कर मारूनही काही निर्णय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, आत्महत्येपूर्वी जाधव यांनी कोणतंही पत्र किंवा संदेश लिहिला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज