टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्रातील हजारो भाविक तिरुपती बालाजीला जात असतात त्याच धर्तीवर राज्यात तिरुपती बालाजीचं भव्य दिव्य असं मंदिर उभे केले जाणार आहे.
येणाऱ्या 21 तारखेला भूमिपूजन करण्यात येणार असून काही वर्षातच हे मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.
तिरुपती देवस्थानम बोर्डचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी आणि कार्यकारी अधिकारी श्री ए.व्ही.धर्मा रेड्डी यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी या दोन्ही नेत्यांचा सत्कार करण्यात आला आणि उभय नेत्यांना शुभाशिर्वाद दिले.
नवी मुंबईत होणार तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर, 21 तारखेला भूमीपूजन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी मुंबईत बालाजीचं मंदीर होणार असल्याने भाविकांना आनंद झाला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज