टीम मंगळवेढा टाईम्स।
मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ होता; मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट अशी की यंदा उजनी धरण १०० टक्के भरणार आहे.
धाराशिवपासून पुणे, सांगलीपर्यंत दुष्काळी पट्टयात चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे.
पंढरपूर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी डख आले होते. यावेळी माजी आ. राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, अभिजित पाटील. बी. पी. रोंगे, गणेश पाटील उपस्थित होते.
वर्षभरातील पावसाचा अंदाज डख यांनी मांडला. पाऊस कधी पडणार याचा अंदाज कसा काढायचा याची माहिती दिली. १० ते १४ जून दरम्यान सोलापूर, अहिल्यानगर, सांगली, सातारा, धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.
दरवर्षी या भागात जूनमध्ये पाऊस कमी असतो. यंदा जूनमध्येच सर्वाधिक पाऊस असेल. जुलैमध्ये आणखी जास्त पाऊस असेल तर ऑगस्ट महिन्यात कमी पडेल, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सुद्धा कमी पाऊस राहील आणि ५ नोव्हेंबरपासून मान्सून देशातून निघून जाईल.
वर्षातील प्रत्येकी चार महिने थंडी, चार महिने उन्हाळा आणि चार महिने पावसाळा असे ऋतूमान असेल तरीही गेल्या काही वर्षांपासून सर्वच ऋतू २२ दिवस पुढे सरकले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी २७, २८ जूनपासून पेरण्याचे नियोजन करावे, म्हणजे दुबार पेरणीचे संकट येणार नाही. दरवर्षी हमखास १० ते १५ जुलै या पाच दिवसात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात पाऊस पडतो, हे ऋतूचक्र आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज