टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या लसीबाबत वाढत्या अपेक्षांमुळे जगभरात सोन्याच्या किंमती खाली येत आहेत. आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किंमती प्रति औंस 1929 पर्यंत खाली आल्या आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूची लस येण्यास भलेही उशीर लागेल. पण, उपचारांची आशा निर्माण होत आहे. बरेच उपचारात्मक चांगेल परिणाम पहायला मिळाले आहे.
म्हणूनच अमेरिका आणि आशियाई बाजाराला वेग आला आहे. या आठवड्यात गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये नफावसूली सुरू ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, येत्या काही दिवसांत पुन्हा हलक्या वेगची अपेक्षा केली जाऊ शकते.
यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व आणि जगातील इतर केंद्रीय बँकांच्या अभूतपूर्व प्रोत्साहन पॅकेजेसने व्याजदरांना शून्यांच्या जवळ आणले आहे.
यामुळे यावर्षी परकीय बाजारात सोन्याच्या किंमतीत सुमारे 28 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू – सोमवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44 रुपयांनी घसरून 53,040 रुपयावर आले होते. शुक्रवारी व्यापारानंतर सोन्याचा दर 10 ग्रॅम 53,084 रुपयांवर बंद झाला होता. सोमवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत 68,202 रुपयांवर आली. शुक्रवारी चांदीचा भाव 68,408 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता.
आज काय होईल? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आज पुन्हा किंमतींमध्ये किंचित घसरण होऊ शकते. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, सोन्याच्या किंमती वरच्या स्तरावरून 5000 रुपयांनी खाली आल्या आहेत.
सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 56,200 वरुन घसरून 51000 रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदी प्रति किलो 12000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या कालावधीत किंमती 78000 रुपयांवरून घसरून 66000 रुपयांवर आल्या आहेत.
The good news is that gold prices are falling again! Thousands became cheaper
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज