टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहराजवळ एका युनिकॉर्न गाडीतुन आलेल्या तिघांनी भारत फायनान्सच्या वसुलदाराला चाकुचा धाक दाखवुन ५५ हजार ९५६ रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना भर दूपारी घडली आसुन आज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की, यातील फिर्यादी वैजनाथ शिंदे हे मंगळवेढा येथे भारत फायनान्स मध्ये लोन ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
दिनांक १८ रोजी दुपारी १.१० वाजता भोसे येथील महिला बचत गटातील व्यक्तींचे जमा झालेले पैसे घेऊन ते मोटरसायकलवरून मंगळवेढाकडे येत असताना
मंगळवेढा शहराजवळील सांगोला ब्रिज जवळ पाठीमागून आलेल्या युनिकॉर्न गाडीतील पंचवीस ते तीस वर्षाची दोन व्यक्ती व पंधरा ते वीस वयाचा एक असे तिघांनी
या ठिकाणी येऊन चाकूचा धाक दाखवून पैशाची बॅग हिसकावून घेतली यामध्ये रोख ४५ हजार ३५६ रूपये, १० हजारांचा टँब, ६०० रुपयांची बायोमँट्रीक मशिन, आसा ऐकुण ५५ हजार ९
५६ रू. किमतीचा मुद्देमाल चाकुचा धाक दाखवुन जबरीने चोरून नेला आहे,
भरदिवसा चाकुचा धाक दाखवुन लुटीचा घडल्याने प्रकार सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मागील दोन महिन्यापुर्वीही आकोले गावाकडे बँकेतुन पैसे काढून घेऊन जानाऱ्या मोटार सायकल स्वारास चार चाकीतुन आलेल्या चोरटंयानी मोटारसायकला गाडी आडवी लावुन लूटन्याचा प्रकार घडला होता,
आद्याप ते चोरटे मोकाटच आसताना राँबरीचा प्रकार झाल्याने चोरट्यांची दहशत वाढली आहे लहान मुलाच्या अंगावर काळ्या रंगाची पॅन्ट पिवळ्या रंगाचा शर्ट होता. पोलीस चोरांचा कसुन शोध घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज