टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यात पोलीस भरती १०० टक्के करण्यास वित्त विभागाची मंजूरी दिलीय. राज्यात तब्बल १७४७१ पोलिसांची भरती होणार आहे. पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण १७४७१ पदांची भरती केली जाणार आहे.
तर इतर विभागांना फक्त ५० टक्के पदांची भरती करता येते. सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरू असतानाच शिंदे फडणवीस सरकारने काही महिन्यांपूर्वी पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता.
नवरात्रौत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती.
राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृहखात्याचा प्लान होता. या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊ कंत्राटी पद्धतीनं ११महिन्यांसाठी भरती केली जाणार होती.
पण या निर्णयावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. मुंबईसारख्या संवेदनशील शहराची सुरक्षा कंत्राटी पोलिसांवर सोपवणं किती योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज