mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; ‘या’ सुविधा बंद करण्याचा घेतला निर्णय; अकाऊंटमधील पैशांचं काय? कोणत्या सेवा वापरु शकणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 2, 2024
in राष्ट्रीय
पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे.

आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे.

आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली केली असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटलं आहे.

केंद्रीय बँकेने मार्च 2022 मध्ये PPBL ला नवे ग्राहक जोडू नये असं सांगितलं होतं. पण तापासात पेटीएमने याचं पालन केलं नसल्याचं समोर आलं. यानंतर आरबीआयने PPBL वर निर्बंध लावले आहेत.

आरबीआयने PPBL च्या सर्व सेवांमध्ये नव्याने पैसे घेण्यावर आणि क्रेडिट व्यवहारावर बंदी घातली आहे. आरबीआयने प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली आहे की, पैसे भरणे आणि काढणे दोन्हीवर बंदी घालण्यात आली आहे.

युजर्सवर काय प्रभाव पडेल?

– आरबीआयच्या आदेशानंतर पेटीएम युजर्सना आपल्या अकाऊंटचं काय होणार याची चिंता सतावत आहे. थोड्या सोप्या शब्दांत हे समजून घेण्याचं प्रयत्न करुयात.

– जर पेटीएम बँकेत तुमचं खातं असेल तर नक्कीच ही थोडी चिंतेची बाब आहे. पण आरबीआयने ग्राहक कोणत्या अडचणीविना पेटीएम बँकेतून पैसे काढू शकतात हे स्पष्ट केलं आहे.

– याशिवाय तुम्ही पेटीएममधून फास्टटॅग रिचार्ज करु शकत नाही. असंही 31 जानेवारीपर्यंत तुम्ही केवायसी अपडेट केलं नसे तर तसंही Paytm FasTAG चा वापर करु शकला नसता.

– जर पेटीएम बँकेत एखादं ईएमआय किंवा स्टेटमेंड पेंडिंग असेल तर तुम्ही ते लवकर क्लिअर करुन घ्या.
– पेटीएम बँक खात्यात तुम्ही कोणताही व्यवहार करु शकणार नाही. ना तुम्ही टॉप अप करु शकता, ना तुम्ही गिफ्ट कार्ड पाठवू शकता. तुम्ही पेटीएम वॉलेट रिचार्जही करु शकत नाही.

– तुम्ही युपीआय पेमेंटसाठी याचा वापर करु शकता. पण यासाठी तुमचं खातं पेटीएम बँक नव्हे तर दुसऱ्या बँक खात्यात असलं पाहिजे.

29 फेब्रुवारीपर्यंत संधी

नवे निर्बंध 29 फेब्रुवारीपर्यंत लागू होणार आहेत. यानंतर पेटीएम ग्राहक अकाऊंट, वॉलेट, प्रीपेड इंस्ट्रूमेंट्स, फास्टटॅग, NCMC कार्डमध्ये ना पैसे डिपॉझिट होतील, ना क्रेडिट व्यवहार होईल. पण ग्राहक त्यांच्या खात्यात असणारा बॅलेन्स संपेपर्यंत सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

29 फेब्रुवारी 2024 नंतर, पेटीएम वापरकर्त्यांना UPI आणि BBPOU (भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट) सारख्या सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा मिळणार नाहीत. मध्यवर्ती बँकेने PPBL ला 15 मार्च 2024 पर्यंत वेळ दिला आहे. या कालावधीत, सर्व प्रलंबित व्यवहार आणि नोडल खाती सेटल करावी लागतील.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पेटीयम

संबंधित बातम्या

खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

बाबो..! स्विस बँकेत भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला; आकडा ऐकून डोकं गरगरेल

June 24, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

लंडनमधली मुलाची भेट अधुरी राहिली, अहमदाबादमध्येच घात झाला; सांगोलच्या ‘या’ वृद्ध दाम्पत्याचा करुण शेवट

June 13, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

June 12, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली; ट्रान्झॅक्शनचा शोध लागू नये म्हणून केली खतरनाक युक्ती…

June 7, 2025
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

May 30, 2025
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

भारतानं इतिहास घडवला! भारताची अर्थव्यवस्था ‘इतक्या’ क्रमांकावर; अमेरिकेकडून आर्थिक कोंडी तरीही मुसंडी

May 26, 2025
Next Post
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी सोडतीसाठी 'या' तारखेला उपस्थित राहावे

ताज्या बातम्या

खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

July 1, 2025
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रेशन दुकानांचा जाहीरनामा; महिला बचत गट, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार; इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा

July 1, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांची बदली; त्यांच्या जागी तहसीलदार प्रदीप शेलार यांची नियुक्ती

July 1, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

संतापजनक! चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने बापाने केला साडीने गळा आवळून चिमुरडीचा खून; मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर बाप अटकेत

July 1, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा