टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी १८ डिसेंबर रोजी मतदान होत असून, ६० मतदान टीमचे प्रस्थान तहसील कार्यालयातून ५० मतदान केंद्रांवर झाले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी मारापूर, येद्राव, गोणेवाडी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बुथवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
संवेदनशील केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीला उभे असलेल्या त्या उमेदवारांचे निर्धारित केलेले प्रतिनिधी यांनाच मतदान केंद्रात जाण्याची संधी मिळेल.
इतरांना त्या ठिकाणी थांबू दिले जाणार नाही. शाळेच्या प्रवेशद्वारावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजितसिंह माने यांनी दिली.
१६ गावांतील मतदान केंद्रांवर लाईट फिटिंग, पाण्याची सोय, विद्युतपुरवठा, दिव्यांगांसाठी रॅम्पची सोय आहे की, नाही याची प्रत्यक्ष पाहणी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केली आहे.
निवडणूक होत असलेल्या १६ गावांत डीवायएसपी राजश्री पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणूक शांततेत कशी पार पडेल. याची पाहणी केली.
पोलिसांनी रूट मार्च काढला. विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद किंवा अन्य कोणत्याही निवडणुकीत या अगोदर ज्या बुथवर बेशिस्तीने मतदान झाले किंवा मतदान करताना ज्या ठिकाणी हस्तक्षेप झाला असेल, अशा पाच गावांच्या संवेदनशील बुधवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
सरपंचपदासाठी मतपत्रिकेचा रंग फिकट निळा
सरपंचपदासाठी मतपत्रिकेचा रंग फिकट निळा ठेवण्यात आला. सदस्यपदासाठी प्रवर्गनिहाय वेगवेगळे रंग ठेवण्यात आले आहेत, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सदस्यांसाठी फिकट गुलाबी, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी फिकट हिरवा, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी फिकट पिवळा, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी मतपत्रिकेचा रंग पांढरा ठेवण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज