मंगळवेढा टाईम्स न्युज।
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भोसे मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या या लढतीत आता ‘डी-फॅक्टर’ पूर्णपणे सक्रिय झाला असून, यामुळे भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर पडद्यामागून हालचाली करणाऱ्या आणि मतदारांवर मजबूत पकड असलेल्या ‘डी-फॅक्टर’ पाठिंबा खांडेकरांना मिळाल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

हा फॅक्टर ज्या बाजूने झुकतो, त्या उमेदवाराचे पारडे जड मानले जाते. यंदा हा प्रभाव थेट भाजपच्या बाजूने काम करत असल्याने विरोधकांचे टेन्शन वाढले आहे.

प्रदीप खांडेकर यांनी गेल्या काही महिन्यांत गावागावात केलेला दौरा आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे. तरुण मतदारांचा ओढा भाजपकडे वळवण्यात खांडेकर यशस्वी ठरले असल्याचे बोलले जात आहे.

विरोधी गोटात झालेली मतविभागणी आणि रणनीतीचा अभाव खांडेकरांच्या पथ्यावर पडत आहे.

’डी-फॅक्टर’च्या छुप्या समर्थनानंतर, भोसे मतदारसंघात खांडेकरांच्या विजयाची केवळ औपचारिकता उरल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही “आता फक्त गुलाल उरलाय!” अशा पोस्ट्स व्हायरल होत आहेत.

”जनतेचा आशीर्वाद आणि ‘योग्य’ रणनीती यांमुळे आमचा विजय निश्चित आहे. भोसेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”- प्रदीप खांडेकर, उमेदवार

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











