mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लागा कामाला! महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ‘या’ तारखेपासून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 16, 2023
in राजकारण, राज्य
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

या आदेशानुसार दि. १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया १ मार्चपासून सुरु होणार आहेत, अशी माहिती सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्व पदावर आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दि १५ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या आदेशानुसार

दि. ०१ एप्रिल २०२१ ते दि. ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता) यांच्या निवडणूक प्रक्रिया दिनांक ०१ मार्च २०२३ पासून सुरू करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत.

या संस्थांच्या निवडणुकांसाठी दि. ०१ फेब्रुवारी २०२३ या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्राधिकरणाने सन २०२३ मधील दि. ०१ जानेवारी २०२३ ते दि.३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील

निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी अनुक्रमे १५०, १२०, ६० व ६० दिवस अगोदर सुरु करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहेत.

या संस्थांच्या निवडणुकांसाठी संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.

ज्या सहकारी संस्था निवडणुकीकरीता प्रारूप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, नियम १९६१ व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे आदेश देखील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

या आदेशानुसार अ, ब, क व ड वर्गातील अनुक्रमे ६३, १०१४, १०१६३ व ९३९८ अशा एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. अ वर्ग संस्थांमध्ये प्रामुख्याने २८ सहकारी साखर कारखाने,

३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, २६ सहकारी सुतगिरण्यांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निवडणूकसहकारी संस्था
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; नेमकं काय कारण? कायदा काय सांगतो

March 24, 2023
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

अखेर मंगळवेढा बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, ‘या’ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात; राजकीय हालचाली गतिमान

March 25, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

खाजगी शाळातील भरमसाठ फी प्रकरणाचा प्रश्न आ.आवताडेंनी अधिवेशनात चव्हाट्यावर आणला; मदतीला विरोधी पक्षनेतेही धावले

March 23, 2023
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

मोठी बातमी! जुनी पेन्शन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; वाचा नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं

March 20, 2023
मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला भरचौकात जोडेमारले; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला भरचौकात जोडेमारले; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

March 20, 2023
नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?

नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?

March 20, 2023
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

मोठी बातमी! माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तिघांना घेतले ताब्यात

March 20, 2023
Next Post
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

तुला खूप मस्ती आली आहे असे म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; पाच जणाविरुध्द गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात कोयता गॅंग?

ताज्या बातम्या

वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंबाची बाग जळून खाक; डोळ्यादेखत उपजीविकेचे साधन जळत असतांना कुटुंबियांना आश्रु अनावर झाले

March 25, 2023
आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

सोलापूरच्या तत्कालीन SP तेजस्वी सातपुते यांच्या कामगिरीची दखल; त्यांच्या ‘या’ उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कार जाहीर

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 25, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

सावधान! ‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली फसवणूक

March 25, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा