टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुला खूप मस्ती आली आहे असे मोटार सायकलवर जाणार्या एकास म्हणत कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले तसेच आमच्या नादाला लागला तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी
आकाश मुदगूल, चैतन विटकर, ऋतिक मुदगूल, आकाश काळे, समर्थ घोडके (सर्व रा.वडरगल्ली,मंगळवेढा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी राज सदाशीव दत्तू (रा.दत्तू गल्ली) हे सुरवसे अँड कंपनी आडत व्यापारी येथे कॉम्प्युटर ऑपरेटर असून ते दि.15 रोजी कामकाज करुन
रक्कम भरण्यासाठी राजमाता बँकेत फिर्यादी व त्याचा मित्र एम.एच.13 सी.एक्स 2762 या मोटार सायकलवरुन 11.30 वाजता गणेशबाग समोरुन जात असताना
पाठीमागून वरील आरोपींनी येवून तुला खूप मस्ती आली आहे असे म्हणून गाडीस लाथा मारुन खाली पाडले, त्यानंतर आरोपीने कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर, कानाच्या पाठीमागे कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
आमच्या नादाला लागला तर तुला जीवंत सोडणार नाही असे धमकी देवून आरोपी निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, मंगळवेढा शहरात असे प्रकार कधी घडत नव्हते या घटनेमुळे मंगळवेढ्यात कोयता गॅंग तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज