mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नगराध्यक्षासह सहा जणांवर सावकारकीसह अपहरणाचा गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
नगराध्यक्षासह सहा जणांवर सावकारकीसह अपहरणाचा गुन्हा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

वडूज येथील माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक संदीप निवृत्ती गोडसे यांनी नगराध्यक्ष सुनील हिंदुराव गोडसे यांच्यासह सहा जणांविरोधात सावकारकीसह अपहरणाची तक्रार वडूज पोलिस ठाण्यात दिली आहे. संबंधितांवर दोन्ही कलमांन्वये गुन्हा दाखल झाल्याने वडूज परिसरात खळबळ उडाली आहे.

सुनील गोडसे, विपुल गोडसे, जयवंत पाटील, राजेंद्र चव्हाण, सचिन माळी, संदीप किसन गोडसे, प्रदीप किसन गोडसे (सर्व रा. वडूज), अशी संशयितांची नावे आहेत.संदीप निवृत्ती गोडसे यांनी वडूज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मला जून 2014 मध्ये लोकांचे देणे भागवण्यासाठी व औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याचे नगराध्यक्ष सुनील हिंदुराव गोडसे, सचिन तुकाराम माळी, जयवंत माधवराव पाटील यांना बोलून दाखवले होते.

त्यावेळी सुनील गोडसे यांनी तुम्हाला रक्‍कम उसनवार देतो, तुम्ही सवडीने परत करा. नाममात्र वार्षिक 15 टक्क्यांप्रमाणे व्याज द्या, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी दि. 22 मार्च 2019 रोजी सुनील गोडसे यांच्याकडून आई व वडिलांच्या दवाखान्यासाठी 9 लाख रुपये पत्नी नम्रता गोडसे यांच्या नावे चेक देऊन रक्‍कम व्याजाने घेतली होती. या रकमेच्या व्याजापोटी नम्रता गोडसे यांच्या गळ्यातील सर्व सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून व पैसे जमवून व्याजापोटी सुनील गोडसे यांना दिले होते. तसेच जेसीबी खरेदीसाठी सुनील हिंदुराव गोडसे यांच्याकडून 11 लाख रुपयांची मदत मागितली होती. ही रक्‍कम वडूज शाखेच्या कराड अर्बन बँकेच्या खात्यातून संदीप गोडसे यांना दिले.

या रकमेपोटी वेळच्या वेळी व्याज दे, असे बजावले. त्यानंतर 20 जानेवारी रोजी 23 लाख रुपये सुनील गोडसे यांना जगदीश विठ्ठल गोडसे यांच्या समक्ष परत केले. तद्नंतर दि. 14 जून 2019 रोजी वडूज नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक लागली. त्यावेळी नगराध्यक्ष पदासाठी सुनील गोडसे यांनी जर तु मला मदत केली नाही तर मला उसनवार घेतलेल्या रक्कमेचे सावकारी पध्दतीने जादा व्याजाची रक्कम द्यावी लागेल, अशी धमकी दिली. तसेच माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, जयवंत पाटील, राजेंद्र चव्हाण, सचिन माळी सर्व (रा. वडूज) यांनी संदीप गोडसे यांना उचलून नेवून हरणेबंदर, कोल्हापूर, पुणे, लोणावळा, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी ठेवले होते.

त्या दरम्यान संदीप किसन गोडसे व प्रदिप किसन गोडसे (दोन्ही रा.वडूज) यांनी संदीप गोडसे यांच्या घरावर लक्ष ठेवून सतत घरातील लोकांना भितीच्या छायेखाली ठेवले होते. नगराध्यक्षपदी सुनील गोडसे निवडून आल्यानंतर उसनवार घेतलेल्या रक्कमेची जादा आकारणी करुन त्यासाठी धमकीचे फोन करत आहेत. तसेच जयवंत पाटील गावात आल्यावर अडवून तुम्ही सुनील गोडसे यांचे पैसे परत द्या, असे म्हणून तसेच आमचे विरुध्द तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सर्व रक्कम त्यांना परत दिली असताना आता विनाकारण नाहक पैशाच्या वसुलीसाठी त्रास देत आहेत. तसेच कुटंबियांना गुंडाच्या मदतीने वारंवार जीवे मारण्याची व घर सोडून जाण्याची धमकी देत आहेत. संदीप किसन गोडसे, प्रदिप किसन गोडसे हे घरी येवून सुनील गोडसे यांचे पैसे परत दे नाहीतर आता व्याजाचे पैसे दे, असे म्हणून मला व आमच्या घरातील लोकांना दगड व काठ्यांनी मारहाण केली आहे. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुनील गोडसे, विपुल गोडसे, जयवंत पाटील, राजेंद्र चव्हाण, सचिन माळी, सदिप किसन गोडसे, प्रदीप किसन गोडसे (सर्व रा.वडूज) यांनी आपसात संगनमत करुन घरी येवून व्याजाची रक्कम देत जा नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे संदीप निवृत्ती गोडसे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार नगराध्यक्षासह सहा जणांच्या विरोधात सावकारकी व संगनमताने अपहरण केल्याची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली असून सदर घटनेचा अधिक तपास पो. नि. अशोक पाटील करत आहेत.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
इंदुरीकरांना मोठा दिलासा,सायबर सेलचा खुलासा

इंदुरीकरांना मोठा दिलासा,सायबर सेलचा खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा