टीम मंगळवेढा टाईम्स । ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होणे हे ठाकरे सरकारचे पाप असल्याची टीका आ.समाधान आवताडे यांनी केली आहे.
भाजप आमदार समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांसोबत मंगळवेढा-सोलापूर रोडवरील टोलनाक्याजवळ चक्काजाम आंदोलन सुरू केले असून यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.
याप्रसंगी प्रणव परिचारक,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , जिल्हा चिटणीस संतोष मोगले,
जिल्हा चिटणीस सिद्धेश्वर कोकरे , जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा चिटणीस हौसाप्पा शेवडे,अविनाश मोरे, बिभीषण बेदरे, विजय बुरकुल, विष्णू मासाळ, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष सुधाकर माळी, भाजयुमो तालुकाध्यक्ष विठ्ठल सरगर , शहराध्यक्ष सुशांत हजारे , सुदर्शन यादव तसेच भाजपचे व ओबीसी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायलयाने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आता मंगळवेढ्यात उमटले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले आहे.
आ.समाधान आवताडे यांनी आंदोलनादरम्यान बोलताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. फक्त महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना मिळालेले राजकीय आरक्षण गेले आहे.
न्यायालयाला हवा असलेला इंपेरिकल डाटा त्यांनी दिला नाही. आयोगाची निर्मिती न केल्यामुळे आरक्षण गेले. हे राजकीय आरक्षण परत मिळवणे हीच भाजपची घोषणा आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ आणि आरक्षण मिळवून देऊ, असे आवताडे म्हणाले आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज