समाधान फुगारे । मं.टा वृत्तसेवा । पोलिसांचे कामाचे स्वरूप लक्षात घेता येत्या काळात पोलिसांची वार्षिक वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी वार्षिक अडीच हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली.
विधानपरिषदेत सदस्य विलास पोतनीस यांनी पोलिसांच्या आरोग्य योजनेसंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,सदस्य विनायक मेटे, गिरीश व्यास यांनी भाग घेतला. या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.
पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना अस्तित्वात आहे.या योजनेंतर्गत 27 आकस्मिक आणि पाच गंभीर रोग-आजारांवर विनामूल्य आंतररूग्ण उपचार घेता येतो. या योजनेमध्ये नवीन आजारांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजनेची थकित देयके ही 3 महिन्यांच्या आत रुग्णालयाला मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल असंही गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केलं.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज