मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपतर्फे प्रांत कार्यालयसमोर आज धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिली.
महामार्गाकरिता संपादित जमिनीचा शेतकऱ्याला मोबदला तत्काळ मिळावा,दुष्काळी ३५ गावाच्या पाणीपुरवठा योजनेला तत्काळ मंजुरी मिळावी, अॅसिड हल्ला,अल्पवयीन मुलीवर अत्याचार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्या आहेत. त्यास आळा बसण्याकरिता आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज