टीम मंगळवेढा टाईम्स ।
टी-20 वर्ल्ड कप 2024 फायनलच्या श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या शिलेदारांनी आयसीसी ट्रॉफीचा 13 वर्षांचा दुष्काळ संपवला.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण टीमने दमदार कामगिरी केली. सामना टीम इंडियाच्या हातातून गेला होता. चतुर कॅप्टन रोहितने गोलंदाजांना योग्य प्रकारे वापर करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाने वर्ल्ड जिंकल्यावर मैदानात रोहित शर्मा आणि किंग विराट कोहली यांनी एकमेकांना मिठी मारली, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टीम इंडियासाठी रोहित शर्माने आतापर्यंत नऊ तर विराट कोहलीने सहा वर्ल्ड कप खेळले आहेत. दोघांसाठी मोठा कालावधी होता परंतु शेवटपर्यंत त्यांनी हार मानली नाही.
टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक आयसीसी ट्रॉफी नसल्याने त्यांच्या रेकॉर्डवर पाणी फेरल्यासारखं होतं. आता ही कमी भरून निघली आहे. टी-२० चा पहिला वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला त्या संघाचा रोहित शर्मा भाग होता.
तेव्हापासून रोहित खेळला खरा पण टीम इंडिया एकदाही ट्रॉफी जिंकू शकली नव्हती. विराट, रोहित, बुमराहसारखे मोठे खेळाडू असूनही आयसीसी ट्रॉफी जिंकत आली नाही यावरून टीम इंडियाला हिणवलं जायचं. मात्र आता टी-२० वर्ल्ड कप जिंकल्याने टीकाकारांच्या तोंडाला कुलुप लागणार आहे.
अखेर ठरलं, रोहित शर्मा, विराट कोहलीची सर्वात मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्त
रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. भारतानं 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर दोन्ही दिग्गजांनी हिच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. पीटीआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील ट्विट केलं आहे.
विराट अन् रोहित निवृत्त
भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. तब्बल 17 वर्षानंतर भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला.
या वर्ल्ड कप विजयासह भारतीय क्रिकेटमधील दोन महान क्रिकेटपटूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय टी 20 कारकिर्दीला पूर्णविराम द्यायचं ठरवलं. विराट कोहलीनं मॅच संपल्यानंतरच निवृत्तीचे संकेत दिले होते. रोहित शर्मानं यानंतर निवृत्तीबाबत घोषणा केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज