टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात 200 पेक्षा अधिक ठिकाणी MPSC च्या परीक्षा होणार होत्या. राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली आहे. मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात रविवारी MPSC च्या परीक्षा होणार होत्या.आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती.
या मागणीला यश आले असून MPSC पुढे ढकलण्यात आली आहे.
Finally, MPSC exam was postponed; a big decision of the state government
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज