टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेकडील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महादेवी तम्माराया पाटील (वय ३३, व्यवसाय मेडिकल) या दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास

स्कुटी (क्रमांक एमएच १३ डीपी ०२०५) वरून उमदीकडे जात होत्या. मरवडे-विजापूर रस्त्यावर, मौजे हुलजंती हद्दीत जगदंबा हॉटेलपासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाची, लाल पट्टे असलेली बजाज पल्सर दुचाकी आली.

दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाने “विजापूरला जाणारा रस्ता कोणता?” असे विचारत क्षणातच फिर्यादीच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे,

सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावले. या झटापटीत फिर्यादी जखमी झाली. आरोपींनी घटनास्थळावरून वेगाने पलायन केले.

या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणताही मुद्देमाल मिळून आलेला नाही. तपास पोलिस उपनिरीक्षक पिसे करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि दुचाकीच्या वर्णनाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













