टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भिमा नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याची वाहतूक करताना टेंपो महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी पकडून यातील टेंपो चालक संदिप उन्हाळे (रा.मंगळवेढा) याच्याविरूध्द वाळू चोरी व पर्यावरणाचा र्हास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,माचणूर येथील भिमा नदीपात्रातून स्मशानभूमीजवळ यातील टेंपो क्र.एम एच 13 जी.0570 यामध्ये दि.26 रोजी सायंकाळी 7.30 ते रात्री 11.00 च्या दरम्यान
आरोपी संदिप उन्हाळे याने तीन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू भरून मंगळवेढयाकडे येत असताना कारखाना पाटीजवळ वाहनातील वाळू ओतून सदरचे वाहन परस्पर घेवून जात असताना
सोलापूर मार्गावरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सुगरण हॉटेलच्या समोर शेतामध्ये सदर टेंपो लावलेला मंगळवेढा मंडलचे मंडल अधिकारी धनंजय इंगोले व तलाठी समाधान वगरे यांना मिळून आला.
याची फिर्याद मंडल अधिकार्यांनी दिल्यानंतर वाळू चोरीचा व पर्यावरण र्हास केल्याचा गुन्हा टेंपो चालकाविरूध्द दाखल करण्यात आला.
दरम्यान,माण नदी व भिमा नदीत पाणी असतानाही पाण्यातून रात्रीच्यावेळी वाळू उपसा करून त्याची विक्री केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
महसूल अधिकार्यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी तलाठयाची पथके केली होती. मात्र ही पथकेही सध्या शांत असल्याने वाळू चोरी करणार्याला मोकळे रान मिळाल्याची खमंग चर्चा सुरु आहे.
प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी शासनाच्या मुद्देमालाची चोरी रोखण्यासाठी पथकांना पुन्हा नव्याने आदेश देवून होणारी वाळूची चोरी थांबवावी अशी मागणी सर्व स्तरातून पुढे येत आहे.
मध्यंतरी तहसीलदार यांनी बेकायदा वाळू साठयावर शहरात कारवाई केली. संबंधितांना नोटीसाही बजावण्यात आल्या.पुढे कुठलीच कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमधून या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हयात कुठेही वाळूचा शासकीय लिलाव नसताना आमच्याकडे पावती असल्याचा कांगावा करण्यात आला.
मात्र या पावत्या कितपत खर्या आहेत याची पडताळणी लवकरच केली जाणार असल्याचे समजते.काही वाळू दलालांनी बनावट पावत्या तयार करून त्याची मोठया आर्थिक आकडयात विक्री केल्याची चर्चा होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज