मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
१२ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यू.एल.जोशी यांनी सुनावली.
विक्रम झाडे (रा.सोलापूर) याला शिक्षा झाली आहे.८ एप्रिल २०१७ रोजी ही घटना घडली होती. फौजदार चावडी पोलिसात पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती.
मुलगी शाळेत असताना विक्रम झाडे हे पाठीमागून आले आणि एवढया उशिरापर्यंत शाळेत थांबायचे नसते, असे म्हणत विनयभंग केला. हा प्रकार मुलीने पालकांना सांगितला. ही घटना मुख्याध्यापक व अन्य शिक्षकांसमोर पालकाने सांगितली.
याबाबत शिक्षकावर कारवाई करण्यात येईल , असे शाळेकडून सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पीडित मुलीचे वडील शाळेत गेल्यानंतर तो शिक्षक शाळेत काम करताना दिसला. शाळेने त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही म्हणून फिर्याद देण्यात आली.
तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.यात मुलगी,तिचे पालक व अन्यजणांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारतर्फे अॅड. माधुरी देशपांडे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमान्य पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षाय एक हजार रुपये दंड ठोठावला.
आरोपीतर्फे अॅड . पी . एम . माने व कोटपैरवी महणून हवालदार श्रीमती जहागीरदार यांनी काम पाहिले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज