टीम मंगळवेढा टाईम्स।
शेत जमिनीची फोड करून विभक्त कार्यवाही करण्यासाठी व सातबारा उतारा देण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच मागून 10 हजार रुपये पहिला हप्ता घेणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सहदेव शिवाजी काळे, (वय ५४, व्यवसाय नोकरी- तलाठी सज्जा कार्यालय दहिवली ता. माढा जि. सोलापूर) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे तसेच त्यांचे नातेवाईक यांचे नांवे मौजे दहिवली ता माढा येथे सामाईक शेतजमीन असुन सदर शेतजमीनीची फोड करून विभक्त करण्याकरीता तक्रारदार यांनी सज्जा कार्यालय दहिवली येथे अर्ज दाखल केला होता.
सदर अर्जानुसार शेतजमीनीची फोड करून विभक्त करण्याची कार्यवाही करण्यासाठी व त्याबाबतचा ७/१२ उतारा देण्याकरीता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे रु ३५०००/- लाच मागणी करुन
तडजोडीअंती रु ३००००/- स्विकारण्याचे मान्य करुन त्यातील पहिला हप्ता रु १००००/- रु लाच रक्कम त्यांचे राहते निवासस्थानी स्विकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार- पोलीस अंमलदार पकाले, जाधव, सण्णके, चापोशि सुरवसे, सर्व ने. अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज