टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर मंगळवेढ्यातील सर्वसामान्य नागरिकांना कोरानाची लस उपलब्ध व्हावी यासाठी शिर्के हॉस्पिटलमध्ये कोविशील्ड लसीचे लसीकरण सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील तसेच इतर तालुक्यातील नागरिकांना धर्मगाव रोडवरील शिर्के हॉस्पिटल येथे फक्त 750 रुपयांत या शासकीय दरात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत लसीकरण सुरू असणार आहे.
कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठी देशभरामध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे.
लस घेताना थेट नोंदणी
नागरिकांना शिर्के हॉस्पिटलमध्ये शुल्क भरून लस घेण्यासाठी थेट जाता येणार आहे. लस घ्यायला गेल्यावर संबंधित दवाखान्यातील आरोग्य कर्मचारी आधारकार्डावरून पोर्टलवर नोंदणी करणार आहेत. त्यामुळे लस घेण्यास आता पूर्वनोंदणीची अट नाही.
कोरोनावर लस सुरक्षित, घाबरण्याचं कारण नाही
लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो; पण लसीकरणानंतर झालेल्या कोरोनाची तीव्रता कमी होते. ताप, खोकला किंवा कोरोनामुळे शरीराच्या इतर अवयवांवर होणारा परिणाम ८० टक्के कमी होतो. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचे आहे.
लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझरचा वापर, तसेच सुरक्षित अंतर ठेवलेच पाहिजे. लसीकरणामुळे कोरोना लाट टाळली जाऊन मृत्युदर कमी करण्यास मदत होणार आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होण्यास मदत.
पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांत शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. “कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याचा धोका संभवतो; पण लसीकरणानंतर लोकांची ८० टक्के प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे लोकांनी लस घेणे आवश्यक आहे.
लसीकरणासाठी येथे करा संपर्क
मंगळवेढा शहरातील धर्मगाव रोडवरील शिर्के हॉस्पिटलमध्ये शासकीय दरात दोन्ही डोस मिळणार आहेत.नागरिकांनी 9028886055 व 9423333365 अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन डॉ.प्रीती शिर्के यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज