mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो, देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या : उदयनराजे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2020
in राज्य
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो, देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या : उदयनराजे

मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. आता याला कुबट वास यायला लागलाय. मंडल आयोगावेळी प्रत्येकाला आरक्षण मिळालं. पण, मराठा समाजाचा विसर पडला. त्यावेळच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता.

आता आरक्षणाची बंदूक आमच्या खांद्यावर न ठेवता. स्वत:च्या हातात घ्या,’ असा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना नाव घेता दिला. दरम्यान, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रभर नेतृत्व करावं लागेल, असंही यावेळी उदयनराजेंनी सुचित केलं.

सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते. संपूर्ण पत्रकार परिषदेत उदयनराजेंचा सर्व रोख हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच होता. पण, पत्रकार परिषदेत एकदाही त्यांनी पवार यांचे स्पष्टपणे नाव घेतले नाही.

खासदार उदयनराजे म्हणाले, ‘ मराठा समाजाचा प्रश्न राजकारणासाठीच प्रलंबित आहे. याच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. आपण किती दिवस या सामाजाचा अंत बघणार. तुम्हाला याची सखोल माहिती आहे. तुम्ही करु नका.

पण, याचं उत्तर द्यायला हवं. आता सत्तेत असणाऱ्यांनी आरक्षण द्यावं. मंडल आयोगावेळी सर्व समाजाला आरक्षण मिळालं. मराठा समाजाचा विसर पडला. त्यावेळच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व मंत्रिमंडळाने यावर भाष्य करायला हवे, असं उदयराजेंनी सांगितले.

मराठा समाजाचा मोर्चा निघाला का हेच नेते काऊंटर मोर्चे काढायला लावतात. ‘संसद आणि राज्याच्या विधीमंडळातील सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी आहे. इतर समाजाच्या लोकप्रतिनिधींनाही मराठा समाजाने मतदान केलेले आहे.

लोकांनी विश्वास ठेवला. आता आरक्षण नसल्याने विश्वास उडाला आहे. सध्या कोरोना आहे. त्यामुळे माणसे शांत आहेत. त्यामुळे हेच लोकं सत्तेतून खालीही खेचू शकतात व घरातून बाहेर पडूही देणार नाहीत, असा इशाराही उदयनराजेंनी यावेळी दिला.

ADVERTISEMENT

थोडीतरी जनाची नाही तर मनाची पाहिजे. जाती जातीत तेढ करु नका, आरक्षण देणार नसेल तर राजीनामा द्या, असा हल्लोबोल करुन खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यांना नावं ठेवली.

आता सत्तांतर झालंय. तुम्ही का आरक्षणाचं काम केलं नाही. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी वकिलाला हजर होऊ दिलं नाही. त्यांना गायब केलं. मराठा समाजाला किरकोळीत काढण्याचाच हा प्रकार आहे. एखादा निर्णय घ्यायला गेलो तर हाणून पाडला जातो. दबाव टाकला जातो.

यावेळी पत्रकारांनी तुमचा रोख शरद पवारांवर आहे का ? असे विचारले यावर उदयनराजे म्हणाले, हो सर्वांवरच आहे. त्याचबरोबर शरद पवार म्हणतात आरक्षणाचा प्रश्न उदयनराजे आणि संभाजीराजेंनी सोडवावा यावर आपले मत काय ? असा प्रश्न केल्यावर उदयनराजे म्हणाले, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवता. तुम्ही हातात बंदूक घ्या.

संभाजीराजेंना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा. फडणवीस यांनी जात पाहिली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा सत्ता द्या, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो, ती जबाबदार माझी’ असेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

हो ला हो म्हणणार नाही; दुसऱ्यावर खापर फोडायचं..

पत्रकार परिषदेपूर्वी बोलताना उदयनराजेंनी अनेक बाबींवर मत स्पष्ट केले. मराठा समाजाला डावललं जातंय. स्वत: करायचे नाही मात्र, दुसऱ्यावर खापर फोडायंच काम सुरू आहे.

कारण, त्यावेळी सर्व काही शक्य होतं. त्यांनी का केलं नाही, असा सवालही उदयनराजेंनी केला. तसेच शासनाने परीक्षा घेताना मराठा समाजाच्या जागा बाजुला ठेवून घ्याव्यात, असेही स्पष्टपणे सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उदयनराजे भोसलेदेवेंद्र फडणवीसमराठा आरक्षण

संबंधित बातम्या

Breaking ! आता निवडणुकीनंतरच समजणार गावाचा सरपंच; आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर

Breaking! सरपंच आरक्षण सोडत तारीख ठरली! एकाच दिवशी अर्ज माघार अन्‌ निवड

January 18, 2021
नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा

सावधान! तुम्हालाही मिळाला आहे का असा मेसेज? गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट

January 17, 2021
मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

काय सांगता ! होय, मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ वर मिळते 11 रुपयात चिकन बिर्याणी

January 16, 2021
आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

धनंजय मुंडेंबाबत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्वाचा निर्णय

January 15, 2021
आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

January 14, 2021
बर्ड फ्ल्यू! राज्यात हाय अलर्ट जारी; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘हा’ आजार अत्यंत धोकादायक

बर्ड फ्ल्यू! राज्यात हाय अलर्ट जारी; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘हा’ आजार अत्यंत धोकादायक

January 12, 2021
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

सुवर्णसंधी! पोलीस खात्यात तब्बल एवढ्या जागांसठी होणार भरती; गृहमंत्र्यांची घोषणा…

January 12, 2021
वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क झाले गायब, निम्मा महाराष्ट्र झाला नाॅट रिचेबल

चुकूनही करु नका 7 अ‍ॅप्संना डाऊनलोड, अन्यथा मिनिटात अकाऊंट होईल रिकामं

January 9, 2021
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

January 9, 2021
Next Post
नीता ढमालेंच्या उमेदवारीने बदलतील पुणे पदवीधर मतदार संघाची राजकीय समीकरणे?

कारखानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी पदवीधर मतदारसंघ नाही : नीता ढमालेंची लाड, देशमुखांवर टीका

ताज्या बातम्या

सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

खळबळ! परिचारक गटाकडे सत्ता असलेल्या ‘या’ गावात सत्तांतर झाल्याने दंडवत घालत त्याने गाठले विठ्ठल मंदिर

January 19, 2021
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

ठरलं! सोलापूर जिल्ह्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत ‘या’ तारखेला होणार

January 19, 2021
आढावा! सोलापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांची सरशी

मरवडे ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन सत्तेची सूत्रे ‘गाव विकास आघाडी’कडे

January 19, 2021
आवताडेंची पॉवर, मंगळवेढ्यात अनेकांना धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

आढावा! सोलापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांची सरशी

January 19, 2021
Breaking ! आता निवडणुकीनंतरच समजणार गावाचा सरपंच; आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर

Breaking! सरपंच आरक्षण सोडत तारीख ठरली! एकाच दिवशी अर्ज माघार अन्‌ निवड

January 18, 2021
आवताडेंची पॉवर, मंगळवेढ्यात अनेकांना धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

आवताडेंची पॉवर, मंगळवेढ्यात अनेकांना धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

January 18, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News