टीम मंगळवेढा टाईम्स ।
आजच्या धावपळीच्या युगात इतरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी परिस्थिती असताना मंगळवेढा येथील सुरसंगम ग्रुपने आपला गायनाचा छंद जोपासण्यासाठी सुरू केलेली संगीत चळवळ आजही टिकवून ठेवली आहे
ही संगीतप्रेमीच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवोदगार महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहमद अयाज यांनी काढले.
सुरसंगम ग्रुपच्या आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मंगळवेढा येथे 18 जुलै रोजी होणार्या राज्यस्तरीय संगीत संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन मोहमद आयाज यांचे हस्ते शुक्रवारी सोलापूर येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मोहम्मद अयाज पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढेकरांना संगीताची ओढ असल्यानेच मान्यवर गायक व चित्रपटसृष्टीतील कलावंताना मंगळवेढयाला येण्याचा मोह आवरत नाही.
अनेक दिग्गज सातत्याने मंगळवेढयात येत असतात. सुरसंगम ग्रुपमुळेच मंगळवेढेकरांना संगीतमय मेजवानी मिळते. व वातावरण प्रसन्न राहते. सुरसंगमची सुरूवात जरी आठ वर्षापुर्वी झाली असली तरी
सुरसंगमच्या कलावंताना अनेक वर्षापासून असलेली गायनाची आवड सर्वपरिचित आहे. मंगळवेढयासारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय सलग पाच संमेलने भरवली.
अगदी कोरोना काळातही ऑनलाईन संगीत संमेलन घेवून खंड पडू दिला नाही. यावर्षीचे सहावे वर्ष असून हे संमेलन देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सुरसंगम ग्रुप प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, सोलापूरचे नृत्य दिग्दर्शक मयुरेश माणकेश्वर, निखिल जाधव आदि उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज