टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर हा रेल्वेमार्ग राजकीय अनास्थामुळे अद्याप हा मार्ग रखडला असून त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे माजी शहराध्यक्ष मुजमिल काझी यांनी केली.
सुप्रिया सुळे या स्थानिक कार्यक्रमाचे निमित्ताने मंगळवेढा दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी या मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रबरोबर सर्वाधिक जास्त भाविक कर्नाटकातून चालत येतात.
परंतु त्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, या दृष्टीने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 108 किमीचा रेल्वेमार्ग 2014-15 मध्ये मंजूर करून घेतला. त्यासाठी 1294 कोटी खर्च अपेक्षित होता. त्या मार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गासाठी निधी दिला नाही.
त्यामुळे हा प्रश्न अद्याप रेंगाळला.या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागल्यास आणि पंढरपूर-लोणंद रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला कर्नाटकातील प्रवाशी व मालवाहतूक उत्तर भारतात जाण्यासाठी सोलापूरमार्गे वाढणारे अंतर व खर्च, वेळेची बचत होणार आहे. शिवाय पंढरपूर-मंगळवेढा या परिसरातील द्राक्षे, डाळिंब, ज्वारी, साखर व इतर शेतमाल दक्षिण व उत्तर भारतामध्ये पाठवणे शक्य होणार आहे.
विजयपूर-पुणे हे अंतर 374 किमी आहे. मात्र, हा रेल्वे मार्ग झाल्यास हे अंतर 314 किमी होऊन 60 किमी अंतराची बचत होणार आहे. स्व. भारत भालके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे राज्यमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली.
तर विद्यमान आ समाधान आवताडे यांनी देखील रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी केली. नव्या सर्वेक्षणानुसर या मार्गाचे अंतर 108 किमीऐवजी जवळपास 85 किमी इतके होत असून त्याचा खर्च एक हजार कोटी आसपास होऊ शकतो. त्यासाठी कोकण रेल्वेप्रमाणे राज्य शासनाने यामध्ये आर्थिक हातभार लावला तर हा प्रश्न मार्गी लावू शकतो,
त्या दृष्टीने आपण लक्ष घालावे अशी मागणी काझी यांनी यावेळी बोलताना केली. खा.सुळे या यापूर्वी मंगळवेढा दौऱ्यावर आले असता त्यावेळी देखील त्यांच्याकडे या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली होती आता पुन्हा एकदा याच प्रश्नांची मागणी केली आहे त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार का याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज