टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील एमआयडीसी परिसरातून अपहरण झालेल्या रणवीरकुमार साहू या चारवर्षीय बालकाच्या कुटुंबाची पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन सखोल चौकशी करून पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शक केले.
दि.१८ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन याचे अपहरण झाल्याच्या घटनेला
दहा दिवस झाल्यानंतरही तपास लागत नसल्यामुळे सोमवारी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
बालकाच्या आई-वडिलांशी चर्चा केली. कुटुंबातील इतरांची चौकशी केली. अद्यापही तपास लागत नसल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक डीवायएसपी कार्यालयातील गुन्ह्याची उकल करण्यात अनुभवी असलेले प्रत्येकी दोन कर्मचारी तपासासाठी घेण्यात आले.
या टीमला योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तपासासाठी यापूर्वी नऊ पथके कार्यरत होती. त्या पथकातील पोलिसांनी आतापर्यंत श्वान पथक, ड्रोन, फिंगरप्रिंट, धार्मिक स्थळे, बसस्थानक व रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे.
तसेच होडीच्या माध्यमातून माण व भीमा नदीपात्रात शोध मोहीम राबवली आहे. मात्र पोलिसाकडे खबऱ्याचे अपुरी जाळे असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारेच पोलिसांना गुन्ह्याची उकल करावी लागणार आहे.
संशयित व्यक्तींची नार्कोटेस्ट करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे तर तपास सर्व बाजूने वेगात सुरू असून, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षमपणे कार्यरत केली आहे.
तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. गुन्हा उघड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज