टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा कारागृहातील न्यायाधीन बंदी असलेल्या एका संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे.
सुनील तानाजी किसवे (वय-21 रा. शिरनंदगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या न्यायाधीन बंद्याचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोस्को गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मंगळवेढा कारागृहातील संशयित आरोपी सुनील तानाजी किसवे वय 21 यांने काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असून या घटनेने पोलीस दलासह तालुक्यात खळबळ उडाली.
नेहमी चर्चेत राहणारे मंगळवेढ्याचे सब जेल आताही पुन्हाही चर्चेत राहिले . सुनील तानाजी किसवे वय 21 रा . शिरनांदगी याच्यावर पोस्को अंतर्गत गेल्या दीड महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता तो सध्या मंगळवेढा येथील सब जेलमध्ये होता.
रात्री जेवणानंतर आरोपीची हजेरी घेत असताना एक आरोपी कमी लागल्याने चौकशी केला असता त्याने चार कोठडीच्या बाजूला ट्रेझरीच्या बोळात मफलरच्या साह्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले.
त्या घटनेची खबर तात्काळ त्याच्या नातेवाईकाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली . तात्काळ अधिकारी व नातेवाईक घटनास्थळी हजर झाल्यानंतर नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आज सकाळी 6.45 च्या दरम्यान दाखल करण्यात आले .
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी भेट दिली .
या घटनेची फिर्याद सिताराम रायप्पा कोळी वय 54 रा अकोले यांनी दिली आहे.
दरम्यान, मंगळवेढा सबजेलची क्षमता कमी आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी कारागृहात असल्याने पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. यावर वेळीच प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य जनता करू लागली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज