टीम मंगळवेढा टाइम्स।
अचानकपणे तीन मणके खराब झाल्यामुळे नसा दबल्या होत्या, शरीरातील पूर्ण ताकद गेल्यामुळे 34 वर्षीय महिला अंथरुणावर अक्षरशः झोपून होती.
मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटल येथील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चौथ्या दिवशीच त्या रुग्णाला उठता, बसता चालता येऊ लागले गेलेली ताकद परत आणण्याची किमया डॉ.प्रवीण सारडा यांनी केली आहे.
श्रीदेवी बिरादार (34 रा.विजापूर,कर्नाटक) ही महिला गेल्या अनेक दिवसापासून अचानक पाठीमधील तीन मणके खराब झाल्यामुळे अंथरुणावर झोपून होती.
कुटुंबातील सदस्यांनी पुणे, मुंबई, मिरज आशा अनेक ठिकाणी उपचारासाठी तिला दाखल केले पण योग्य उपचाराअभावी वेळ आणि पैसे विनाकारण खर्च झाले.
मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटल येथे होणाऱ्या यशस्वी शस्त्रक्रिये बद्दल त्यांना माहिती झाली आणि पेशंटला ऍडमिट करण्यात आले.
डॉ.प्रवीण सारडा यांनी तपासणी केल्यानंतर तीन मणके खराब झाल्यामुळे नसा दबल्या असल्या कारणाने शरीरातील पूर्ण ताकद गेली होती.
डॉक्टरांनी लागलीच उपचार करून शस्त्रक्रिया केली व अवघ्या चौथ्या दिवशी श्रीदेवी बिराजदार या उठून बसू लागल्या चालू लागल्या ही यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल नातेवाईकांनी डॉ.प्रवीण सारडा यांचे आभार मानले.
हाडांचे व मणक्यांचे तज्ञ अशी ख्याती पसरली आहे त्यामुळे जिल्हा, राज्य ओलांडून पेशंट उपचारासाठी गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये येत आहेत.
मंगळवेढेकरांच्या हक्काचे गजानन लोकसेवा हॉस्पिटल नागरिकांसाठी 24 तास सुरू असून रुग्णसेवेसाठी डॉ.प्रवीण सारडा हे 24 तास उपलब्ध असतात.
मणक्याच्या व हाडांच्या संपूर्ण शस्त्रक्रिया येथे होत असल्यामुळे नागरिकांची वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज