मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदायीनी असलेली व गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली
भोसे ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेर आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाली असून या योजनेचे पाणी जुनोनी येथील फिल्टर टाकी मध्ये दाखल झाले आहे.
ही योजना दीर्घ काळानंतर सुरू झाल्याने या भागातील माय माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा बंद होणार असून ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळणार असल्याने आ.समाधान आवताडे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी भोसे व 39 गावासाठी भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित परंतु गेल्या अनेक दिवसापासून ही योजना विज बिल व पाणीपट्टी थकीत असल्याने या भागातील या योजनेचे पाणी मिळत नव्हते
परंतु या भागातील महिला वर्गांची पाण्यासाठी होणारे कुचंबना दूरवरून डोक्यावर हंड्याद्वारे आणलेले पाणी विकतचे टँकर घेऊन पाण्याची गरज भागवलेचे चित्र
या भागात दिसून आल्याने आमदार समाधान आवताडे यांनी ही योजना कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा चंग बांधला त्या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत तीन ते चार वेळा बैठका घेतल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील , पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही योजना चालू करण्यासाठी धडपड सुरू ठेवली
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण दूर व्हावी तसेच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असणारा पिण्याच्या पाणी प्रश्न सोडवून दुष्काळी तालुका असा मंगळवेढ्याचा कलंक पुसण्यासाठी आ आवताडे यांनी आपल्या लोकप्रतिनिधीत्व पदाचा आणि अधिकाराचा खूप व्यापकतेने वापर केला आहे.
याचीच फलश्रुती म्हणजे गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असणारी भोसे ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा सुरु होण्यासाठी आ आवताडे यांनी वेळोवेळी शासन दरबारी आणि स्थानिक संबंधित प्रशासन यंत्रणेकडे लावलेला रेटा कामी आला आहे.
ह्या योजनेचे 35लाख रुपये बिल महावितरण कडे प्रशासनाने भरले असून दुरुस्तीसाठी दहा लाखाची तरतूद करीत सर्व यंत्रांच्या माध्यमातून योजना सुरू होण्यासाठी प्रयत्न केले.
आमदार अवताडे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे शुक्रवार, दिनांक २६ मे २०२३ रोजी जुनोनी येथील फिल्टर टाकीमध्ये या योजनेचे पाणी पोहचले आहे. हे पाणी योजनेच्या पुढील टप्प्यात साठी मार्गक्रमण झाले आहे या पाण्यामुळे आणि उन्हाळ्यात दक्षिण भागातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे
धोरणात्मक विकासवाटेच्या मार्गावरून मतदारसंघातील मूलभूत आणि पायाभूत सोयी – सुविधा सक्षम करण्यासाठी आ आवताडे यांनी रस्ते, वीज, पाणी आरोग्य, शिक्षण आदी प्रगतीपथाचे दरवाजे निधीच्या रूपाने मजबूत केले असताना अनेक वर्ष लोकांच्या मनात असणारी ही योजना स्थानिक पाणीपुरवठा अधिकारी व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळींच्या सौजन्याने मार्गी लागल्याने जनतेमध्ये पाणीदार आमदार असे आ आवताडे यांच्या कार्यनेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र मतदारसंघामध्ये निर्माण झाले आहे.
दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांच्या अथक परिश्रमाने हे पाणी येथील नागरिकांना मिळाले असून याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत असल्याचे भोसे प्रादेशिक समितीच्या अध्यक्षा मनीषा खताळ यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज