मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजचा मार्च 2023 या शैक्षणिक वर्षाचा एचएससी बोर्डाच्या परीक्षेत 97 % निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.सुजित कदम यांनी अभिनंदन केले आहे.
मार्च 2023 मध्ये राज्य शालात उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड एच एस सी परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले कॉलेजचा शेकडा निकाल ९७% लागला आहे.
कला, वाणिज्य, शास्त्र आणि व्यावसायिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यानी चांगले गुण मिळवले आहेत.
कला शाखेचा शेकडा निकाल ८९ टक्के लागला तर कॉमर्स शाखेचा ९९.२१ % तर शास्त्र शाखेचा शेकडा निकाल ९९.५७ % लागला असून व्यावसायिक शिक्षण विभागाचा निकाल ९८. ७५ % लागला आहे .
कला शाखेतील कु.सरवदे साक्षी ७८.३३ % ( प्रथम) कु.डोंगरे प्रियांका रामचंद्र ७७.५०% टक्के (द्वितीय), कु.चौगुले उज्वला हरिबा ७६% (तृतीय) क्रमांक मिळवला आहे.
कॉमर्स शाखेत कु स्वाती मनगेनी ८७.१७ टक्के (प्रथम), कु.नीलम पवार ८३.८३,.कु मोनिका काळूगे ८३.८३ (द्वितीय) कु हर्षदा इंगोले ८२.६७ टक्के ( तृतीय) क्रमांक पटकावला आहे.
बारावी शास्त्र शाखेत कु. बुरकुल गौरी गुराप्पा ८६.६७ %( प्रथम) कु.गवळी प्रतिक्षा अर्जुन ८२% (द्वितीय), कु.यमगर प्रतिभा रामचंद्र ८१.३३% (तृतीय) .
व्यावसायिक शिक्षण विभागातून पवार तनुजा परमेश्वर ८४.५० टक्के(प्रथम) सुरवसे प्रणाली ज्ञानेश्वर ८०.१७ टक्के ( द्वितीय) हेगडकर संकेत रामचंद्र ७९.५० टक्के (तृतीय) क्रमांक मिळवला आहे.
वरील यशस्वी विद्यार्थ्याना इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेज मधील सर्व प्राध्यपकानी अतिशय चांगले मार्गदर्शन केले या निकालामुळे इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेज च्या उज्वल यशाची परम्परा कायम राहिली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,संस्थेच्या अॅडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम,अध्यक्ष अॅड सुजीत कदम ,सचिवा प्रियदर्शनी महाडिक, संचालिका तथा उपप्राचार्या तेजस्विनी कदम,सहसचिव श्रीधर भोसले,
संचालक अजिता भोसले, रामचंद्र नेहरवे, प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप, चंदनशिवे सुहास माने आदिंनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज