टीम मंगळवेढा टाईम्स । म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात सोडावे म्हणून शिरनांदगी सारख्या दुर्गम भागात, ऐन थंडीत, तलावातच आंदोलन केले. आज शिरनांदगी तलावातील पाणी पाहून त्यावेळी पाण्यासाठी उभारलेला लढा सार्थकी लागल्याचे समाधान वाटत आहे असे मत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्या शैलाताई गोडसे यांनी व्यक्त केले.
शैला गोडसे यांनी शिरनांदगी तलावात आलेले पाणी पूजन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना ग्राहक पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता कळकुंबे, शिवसेना महिला आघाडीच्या माजी तालुकाप्रमुख सुशीला सलगर, बंडू गडदे, उत्तम काशीद, भोजलिंग जानकर, बयाजी जानकर, हरिदास खांडेकर, धनाजी खताळ, सुरज काशीद, अंबादास घाडगे, सुग्रीव पाटील हे उपस्थित होते.
गोडसे पुढे म्हणाल्या, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शिरनांदगी तलावात पाणी सोडण्यास प्रशासनाच्यावतीने चालढकल करण्यात येत होती. म्हणून आम्ही तलावातच आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची दखल घेत म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी शिरनांदगी तलावात येऊन पाणी सोडण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे पाणी सोडण्यात आले होते पण जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालवा फोडून पाणी इतरत्र वळविल्यामुळे त्या वेळी पाणी शिरनांदगी तलावापर्यंत पोहोचतो शकले नाही.
यानंतर ऐन पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर येऊन सांगली जिल्ह्यातील लोकांचे हाल होते. हे पाणी दुष्काळग्रस्त मंगळवेढा तालुक्याला द्यावे ही मागणी आम्ही केली. आणि गेले वर्षभर त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यावेळी केलेले आंदोलन व पाठपुरावा याचे फलित म्हणून आज शिरनांदगी तलावात आलेले पाणी पाहून आपण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काहीतरी करु शकलो याचा मनापासून आनंद वाटत आहे.
आठ गावांच्या समावेशासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
म्हैसाळ योजनेचे मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या लवंगी, आसबेवाडी, सलगर (खू.), सलगर (बु), शिवनगी, सोड्डी, येळगी, हुलजंती या आठ गावांच्या सीमेवरुन जात होते पण या गावांना म्हैसाळचे पाणी मिळत नव्हते. म्हणून या आठ गावांचा नव्याने समावेश होण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला.
या गावांचा समावेश होण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. आता या गावांचा समावेश पूर्णतः होण्यासाठी आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच मंगळवेढा तालुका हे म्हैसाळ योजनेचे शेवटचे टोक आहे. त्यामुळे दरवर्षी पाणी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.:-शैला गोडसे,जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी
Satisfied with the success of the fight to get the water of Mahisal into Shirnandagi Lake Shailatai Godse
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज