टीम मंगळवेढा टाईम्स ।
ट्रॅक्टर खड्ड्यात गेल्याने अंगावर पडून एका शेतकऱ्याने आपले प्राण गमावले आहेत. मंगळवेढा तालुक्यात भाळवणी हद्दीत हा अपघात झाला आहे. ट्रॅक्टर अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात झाली आहे.
सुभाष रामहरी गायकवाड (वय-55 रा. भाळवणी ता.मंगळवेढा) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून याची फिर्याद बालाजी तुकाराम चव्हाण (रा.ब्रम्हपुरी ता.मंगळवेढा) यांनी दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल दि.14 एप्रिल रोजी दुपारी 1 च्या सुमारास फिर्यादीचे मेव्हणे मयत सुभाष रामहरी गायकवाड हे त्यांचे शेतात
टॅक्टर चालवित घराकडे येत असताना शेतातील खड्यात टॅक्टरचा तोल जावुन अंगावर पडून टॅक्टरचे बोणेट पडल्याने त्यात ते गंभीर जखमी होवुन
स्वतः चे मयतास व टॅक्टरचे किरकोळ नुकसानिस कारणीभुत झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मयत सुभाष रामहरी गायकवाड हे आपल्या घरातील टॅक्टरने शेतातून येत असताना सदरचा टॅक्टर हा शेतातील खड्यात पलटी होवुन टॅक्टरच्या बोणेट खाली सापडुन गंभीर जखमी झाले होते.
आजु-बाजुच्या लोकांच्या मदतीने टॅक्टर उचलुन त्यांना बाहेर काढून उपचारा करीता रुग्णालयात आणत असताना वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले.
ठाकरे… आम्ही खोकी जपून ठेवणाऱ्यातले नाही : पाटील, सांगोल्यात अजित पवारांसह संजय राऊत यांच्यावर टीका
मी पाटलाची औलाद हाय. खोकी घरात ठेवणाऱ्यातले आम्ही न्हाय. नागजपास्न कोळेगावपर्यंत पत्रावळ्यासारखी १७५ खोकी इस्कटल्याती.
इस्कटणारी कर्णाची औलाद हाय, अशी घणाघाती टीका आमदार शहाजी पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. संजय राऊत यांच्यावर केली.
शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांना ५० खोकी मिळाल्याचा आरोप विरोधक अनेक दिवसांपासून करत आहेत. या आरोपांना सर्व बंडखोर आमदार जशास तसे उत्तर देताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आमदार पाटील हे पत्रकारांशी बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी उगीच पोकळ सभा घेऊन फिरू नये. निवडणूक जवळ येवू द्या. मी एकाच सभेत या त्यांना पुरून उरेन. पन्नास खोके घेतल्याचा आरोप खा. राऊत करत असल्याच्या आरोपाला त्यानी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ‘खोकी आली की आम्ही जवळ ठेवत नाही. ती वाटून टाकत असतो. अशी पाऊणे दोनशे खोकी मी पत्रावळ्या सारखी उधळली आहेत. उद्धव ठाकरे तुम्ही नातवासाठी खोकी जपून ठेवा. ती नासून जातील. असा पुनरूच्चार त्यानी केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज