mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाने पुढे ढकलल्या परीक्षा; प्रथम, तृतीय व अंतिम वर्षाची परीक्षा कधी? जाणून घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 17, 2023
in शैक्षणिक, सोलापूर
विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

‘एमपीएससी’ आणि ‘गेट’ परीक्षेमुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन केले.

याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने २० जानेवारीऐवजी परीक्षा २३ जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए, बीएड, बीपीएड, या अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची सत्र परीक्षा २० जानेवारीपासून घेण्याचा निर्णय घेतला होता.

या विद्यार्थ्यांचे सत्र ऑगस्ट २०२२ रोजी सुरु झाले असून त्यांचा संपूर्ण सिलॅबस शिकवून पूर्ण झाला आहे. परंतु, विद्यार्थ्यांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रविवारी विद्यापीठासमोर आंदोलन केले.

यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सहमंत्री रोहित राऊत, सचिन पारवे, आदित्य मुस्के, पार्थ तेरकर, प्रशांत मदकंटे आदी उपस्थित होते.

आंदोलनामुळे विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २३ जानेवारीपासून घेण्याचा निर्णय घेतला. तसेच नवीन बदलानुसार आता बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए, बीएड, बीपीएड अभ्यासक्रमाच्या तृतीय तथा अंतिम वर्षाची परीक्षा २७ जानेवारीपासून सुरु होणार आहेत.

अभियांत्रिकीची परीक्षा २५ जानेवारीपासून

‘गेट’ परीक्षेमुळे बी-टेक तृतीय वर्ष व अंतिम वर्षाची परीक्षा २० जानेवारीऐवजी पुढे ढकलावी, अशी मागणी यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली होती.

त्यांची मागणी विचारात घेऊन विद्यापीठाने आता या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा २५ जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा २१ ते २४ जानेवारी दरम्यान होणार असल्याने या काळात विद्यापीठाची परीक्षा होणार नाही, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले. पूर्वीच्या वेळापत्रकात विद्यापीठाने तसा बदल केलेला आहे.

फेब्रुवारीत परीक्षा घेण्याची मागणी, पण…

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची ‘गेट’ परीक्षा झाल्यानंतर साधारणत: १३ फेब्रुवारीनंतर विद्यापीठाने सत्र परीक्षा सुरु करावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी केली होती.

पण, त्यामुळे सर्वच सत्र परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल अशी बाजू विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी समजावून सांगितली. त्यानंतर विद्यापीठाने बी-टेकच्या तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पाच दिवस परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.(स्रोत; सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर विद्यापीठ

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 2, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
Next Post
भगीरथ भालकेंनी ‘ती’ घोषणा करताच राष्ट्रवादीसह भालके गटाला लागली घरघर; नानांचे कट्टर समर्थक आ.आवताडे गटात

भगीरथ भालकेंनी 'ती' घोषणा करताच राष्ट्रवादीसह भालके गटाला लागली घरघर; नानांचे कट्टर समर्थक आ.आवताडे गटात

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 2, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा