टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केलं जाणार आहे. तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगळता बाकी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यात आलं होतं.
आता यावर्षी देखील कोरोनाचा उद्रेक पाहता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
आरटीईच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेत आहोत. यासर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
आपण प्रयत्न करत होतो की मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, परंतू कोरोनामुुळे ते शक्य झालं नाही, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
आपल्याला माहित आहे राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्युब याच्या माध्यामातून शिक्षण सुरू ठेवलं. पहिले ते चौथीच्या शाळा या शाळेमध्ये सुरू करू शकलो नाही.
पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या. परंतू काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या काही ठिकाणी त्या सुरू होऊ शकल्या नाहीत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज