टीम मंगळवेढा टाईम्स । सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. कोर्टाच्या या निर्णयानंतर शिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये नैराश्य पसरले आहे. बीड तालुक्यातील केतुरा येथील नीट परीक्षा दिलेल्या विध्यार्थ्याने आरक्षणाच्या कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
१८ वर्षाच्या विवेक राहाडे या विध्यार्थांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही?
याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने आज दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकस्मिक मृत्यूची नोंद बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.
विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
‘मी कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा असून जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. परंतु मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा नीट परीक्षेत नंबर लागत नाही. मला खाजगी महाविद्यालयात शिकवण्याची माझ्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाही, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे.
माझ्या मृत्यूनंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्याच्या मुलाची किव येईल आणि माझे मरण सार्थकी लागेल’ असे विवेकने त्या कथित चिट्ठीत लिहिल्याचे सांगितले जात आहे.
आरक्षण स्थगितीमुळे आत्महत्या
मयत विवेक रहाडे याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी घरात आढळून आली. त्यात त्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे म्हटले आहे. खासगी संस्थेत शिक्षण घेण्याची ऐपत नाही.
केंद्र व राज्य सरकारने आता तरी समाजातील मुलांची कीव करावी असा उल्लेख केलेला आहे. कुटुंबीयांनी ही चिठ्ठी पोलिसांकडे दिली असून आरक्षण स्थगितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
The student choked; Claim of suicide due to suspension of Maratha reservation
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज