टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी, आंधळगाव, मारापूर, भाळवणी, पाठखळ, आदी ग्रामीण भागात आज झालेल्या जोरदार वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामध्ये रस्त्यावर झाडे पडले आहेत तर काही ठिकाणी घरावरचे पत्रे, जनावरांचे शेड याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेली दोन महिने कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही झालेल्या नागरिक व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला हा संघर्ष सुरू असतानाच आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वादळी जोरदार वादळी वाऱ्याने हजेरी लावली.
त्यामध्ये ग्रामीण भागातील मारापुर लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, पाटकळ, हाजापूर,जालीहाळ, भाळवणी या गावातील गावातील नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर काही पशुपालकाच्या जनावराच्या शेडचे मोठे नुकसान केले. तर कचरेवाडी येथे झाड पडून गाईचा मृत्यू झाला आहे.
या वादळात गाराचा पाऊस पडल्याने फळ पिकाचे देखील नुकसान झाले आहे तर ग्रामीण भागात रस्त्या लगत असणारी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली तर विजेचे खांब मोडून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला.
जालीहाळ येथे नारायण शेंबडे, भारत शेंबडे ,कुबेर कांबळे, शरद कांबळे ,मधुकर शेंबडे, दामोदर शेंबडे, उषाबाई शेंबडे यांच्या घरांचे पत्रे उडून गेले.
भाळवणी येथे बाळू सावजी, आनंदा जावीर, कलावती भगरे, दगडू पुजारी,गणपत माने,अशोक शिंदे, मुक्ताबाई कांबळे मंगल कांबळे हिराबाई कांबळे यांच्या घराचे पत्रे तर ज्ञानेश्वर माने व चंद्रकांत मोरे यांच्या जनावरांच्या शेडचे नुकसान झाले.
तर हजापूर येथे घराची पत्रे उडाले तर विजेच्या खांबा तुटून रस्त्यावर पडल्या. सुदैवाने विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जीवित हानी टळली आहे. फळे पिकांचे व जनावरांचे शेड ची नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.
आंधळगाव येथे सयाजी नागणे यांच्या घराचे पत्रे उडून गेले व कडव्याचे नुकसान झाले, गावठाणा झाडे रस्त्यावर व विजेच्या खांबावर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला.
मारापुर येथे अनेक घराचे पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांना बेगर व्हावे लागले. त्यामध्ये संसार उपयोगी साहित्याचे पावसात भिजल्याने नुकसान झाले. सरपंच विनायक यादव यांनी या बेघरांना माध्यमिक शाळेत राहण्याची व्यवस्था केली आहे.
खोमनाळ येथे संभाजी कोडग यांच्या पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खुपसंगी येथे अंकुश पडवळे यांच्या शेडचे नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला दुष्काळाने बेजार नागरिकांना अवकाळी पावसाने दिलेल्या केलेल्या नुकसानीने आणखीनच त्रस्त व्हावे लागले.
नुकसान झालेल्या घराचे व फळ पिकाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत जेणेकरून नुकसान झालेल्याची संख्या आणखीन वाढणार आहे व वस्तुनिष्ठ नुकसानीचा अंदाज समोर येणार आहे. त्या दृष्टीने तात्काळ पावले उचलावेत अशी मागणी येथील जालीहाळचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज