मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्हा परिषदेत दरवर्षी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा आयोजित करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांची नुकतीच नियुक्ती झाली असल्याने या सभेबाबत जि. प. पदाधिकार्यांत गोंधळ निर्माण होत असल्याने बजेटची सभा लांबणीवर पडत आहे. दरवर्षी 15 मार्चपर्यंत बजेटची सभा घेण्यात येते. यंदा या सभेची तारीखही अजून निश्चित करण्यात आली नाही.
जि.प. अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्या सूचनेनुसार जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोेंगरेे यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या सभेत सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता बजेट सादर करण्यात येणार आहे.
जि. प. स्वउत्पन्नातून जिल्हा परिषदेचे बजेट सभागृहात सादर करण्यात येते. यंदाच्या वर्षी सुमारे 55 ते 60 कोटींचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचा असण्याची शक्यता आहे. या निधीतून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, महिला, दिव्यांग, मागासवर्गीय यांना कोणत्या योजना मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. जि. प. समाजकल्याण, महिला व बालकल्याण या दोन विभागांकडील योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या विभागांकडून लाभार्थ्यांना 90 ते 100 टक्के अनुदान विविध वस्तू व सेवाकरिता देण्यात येते. त्यामुळे समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता धांडोरे व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती शटगार यांच्याकडून कोणत्या नव्या योजना सुरु होणार व यासाठी मिनी मंत्रालयाचे अर्थमंत्री विजयराज डोंगरे किती निधी देणार याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.
जि. प. कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकर्यांना विविध योजनांसाठी अनुदान देण्यात येते. या विभागाकडून 50 टक्के अनुदान शेतकर्यांना देण्यात येते. त्यामुळे या विभागातील योजना सर्वसामान्य शेतकर्यांना फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांना देण्यात येणार्या एक-दोन योजना कमी झाल्या तरी चालतील; मात्र शेतकर्यांनाही किमान 75 टक्क्यांपुढे अनुदान देण्यात यावे तरच कृषी विकासाला खर्याअर्थाने मदत होणार असल्याची भावना शेतकर्यांतून व्यक्त होत आहे.जि. प. पदाधिकार्यांच्या दालनासाठी व अधिकार्यांच्या कार्यालयांच्या बांधकामासाठी दरवर्षी मोठा निधी खर्च होत असून या बजेटमध्ये पदाधिकारी व अधिकार्यांना किती निधी मिळणार, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज