mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 13, 2021
in सोलापूर, राज्य
महाराष्ट्रात कडक निर्बंधांबाबत ‘या’ तारखेनंतर घोषणा होण्याची शक्यता?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यात 11 दिवसांत 1 हजार 219 रुग्ण वाढले असून या महिन्यात शहरात दहा जणांचा तर ग्रामीणमधील 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहर- जिल्ह्यात कडक लॉकडाउन होणार नाही परंतु निर्बंध कडक केले जातील असे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.शुक्रवारपासून दि.19 मार्चपासून हॉटेल, दुकाने, प्रवासी वाहने, बिअर बार, शाळांबाबत कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील 11 दिवसांत कोरोनाचे 721 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे सोलापूर शहरात 394 नवे रुग्ण आढळले असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

कमी झालेला कोरोना काहीजणांच्या बेशिस्तपणामुळे पुन्हा वाढू लागला असून त्याअनुषंगाने सोमवारी दि.15 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

त्यानंतर गुरुवारी दि.18 मार्च रोजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील निर्बंधाचे निकष निश्‍चित केले जाणार आहेत.

विवाह व अंत्यविधीसाठी 50 जणांची मर्यादा; नियम मोडणाऱ्यांवर दाखल होणार थेट गुन्हे
नागपूर, अमरावती, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये काही दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांची परिस्थिती चिंताजनक होऊ लागली असून पुण्यात लॉकडाउन नाही, परंतु निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर आता सोलापूर शहर-जिल्ह्यातही कडक निर्बंध घातले जातील, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना सांगितले.

लॉकडाउन हा कोरोनाला रोखण्याचा अंतिम उपाय नसून नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केल्यास निश्‍चितपणे कोरोनाविरुध्दची लढाई जिंकता येईल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कडक निर्बंधांबाबत सखोल चर्चा होऊन नियोजन केले जाईल. गुरुवारी दि.18 मार्च रोजी अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजन आणि त्या निर्बंधांच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील आढावा घेऊन त्यानुसार आदेश काढले जाणार आहेत.(सकाळ)

कडक निर्बंध लागू होणार!

सोलापूर शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. कोरोना वाढणार नाही.

यादृष्टीने प्रत्येकांनी कुटूंब माझी जबाबदारी आणि माझे गाव कोरोनामुक्‍त गाव या मोहिमाअंतर्गत नियमांचे पालन करावे. जेणेकरून लॉकडाउनशिवाय आपण कोरोनामुक्‍त होऊ, असा विश्‍वास आहे.- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कडकनिर्बंधलॉकडाउनसोलापूर जिल्ह्यात

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; उद्या मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 9, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
Next Post
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

नागरिकांनो! कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या 38 जणांवर गुन्हे, 13 लाख रुपयांचा दंड

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; उद्या मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 9, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..