मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात मागील आठ-दहा दिवसांपासून पुणे जिल्हा परिसर तसेच घाटमाथा भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी जलाशयाचा पाणीसाठा 40 टक्क्यांवर गेला आहे.
Solapur The water storage of Ujani reservoir has gone up to 40%
बंडगार्डन तसेच दौंड येथून उजनी जलाशयात येणाऱ्या विसर्गात वरचेवर वाढ होत असल्याने येत्या चार-पाच दिवसांत उजनी जलाशयाचा पाणीसाठा “फिफ्टी’ (50 टक्के) पार करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला देवधर, भाटगर, गुंजवणे, वीर आदी धरणांत 80 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा झाला आहे.
सुरवातीला उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरेल का नाही? अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु, आता मात्र वरचेवर पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने उजनी जलाशयामध्ये निश्चितच 100 टक्के पाणीसाठा होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
उजनी जलाशयात समाधानकारक पाणीसाठा होऊ लागल्याने उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. उजनी जलाशयाच्या पाणी साठ्याकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे व अहमदनगर जिल्ह्याचेही लक्ष असते.
उजनी धरणात सध्या येणारे पाणी,बंडगार्डन : 26500 क्युसेक, दौंड : 21000 क्युसेक होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज