समाधान फुगारे । शासनाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे गुरूवारी आदेश काढले आहेत.यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली अहमदनगरच्या पोलिस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे.
श्री.मनोज पाटील पाटील यांनी सुमारे दोन वर्ष सोलापूर ग्रामीणमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून उत्तम पद्धतीने काम केले होते.त्यांच्या काळात पोलिस खात्याला चांगली शिस्त लागली होती.
दहा वर्षांपूर्वी अपर पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी सोलापुरात काम केले होते. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील गुन्हेगारी, चोरी, घरफोडी यावर नियंत्रण ठेवले होते.
नागरिकांशी जनसंपर्क वाढवून चांगल्या पद्धतीचे पोलिसिंग केले होते.तसेच आषाढी वारीचा बंदोबस्तातही चांगले नियोजन केले होते. सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही विविध उपक्रम राबवले.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना त्यांनी आपल्या कार्यकाळात चांगलाच चाप लावला. श्री.पाटील यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही.
Solapur Superintendent of Police Manoj Patil transferred to Ahmednagar
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज