टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी माहिती समितीच्या सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेला अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, उमेश पाटील , त्रिभुवन धाइंजे, आनंद तानवडे आदी उपस्थित होते.
उमेश पाटील यांनी ग्रामपंचायती हद्दीतील अतिक्रमणांकडे लक्ष वेधले. अतिक्रमणामुळे अडचणी येत असून , राजकारण होऊन तंटे निर्माण होत आहेत. इतर सदस्यांनीही अतिक्रमण काढण्याची मोहीम घ्यावी, अशी मागणी केली.
चर्चेअंती अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिका – यांनी भेट द्यावी अशा सूचना करण्यात आल्या. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी टास्क फोर्स नेमून अतिक्रमणे हटविली जातील असे सांगितले.
त्रिभुवन धाइंजे यांनी अंगणवाडीतील पोषण आहार घोटाळाप्रकरणी १३२ पानी पुरावे दाखवित संबंधितावर गुन्हे दाखल. करावेत अशी मागणी केली. यावरून , गोंधळ सुरू झाला.
उमेश पाटील यांनी गेल्या सभेत हा मुद्दा उपस्थित केल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केल्याचे सांगितले. या समितीचा अहवाल आल्यावर कारवाईबाबत आग्रह धरू असे सांगितले.
त्यावर सीईओ स्वामी यांनी गुंडे रजेवर असल्याने अद्याप अहवाल प्रलंबित आहे. आठ दिवसात अहवाल येईल त्यानंतर कारवाईचे ठरवू असे स्पष्ट केले.
पाच विषयांना मंजुरी
स्थायी सभेत पाच विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर इतर महत्त्वाचे विषय मार्गी लागण्यासाठी फेब्रुवारीअखेर सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज