मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे.मंगळवारी चक्क 31 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तणाव कमी होण्याची शक्यता दिसत आहे.
सोलापुरात मंगळवारी 2 रुग्णांचे अहवाल पाॅसिटीव्ह आले आहेत तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत नाही आहे.
दरम्यान, सोलापुरात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 277 तर गेला आहे तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी एकूण १३३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १३१ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझिटिव्ह असून दोन जणांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
अद्याप २११ अहवाल प्रलंबित असून आज रविवार पेठ परिसरातील ५२ वर्षीय महिला, शिवाजी नगर, मोदी खाना परिसरातील ७१ वर्षीय व्यक्तीचे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज