टीम मंगळवेढा टाईम्स । पीपीई कीट परिधान करून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने शहरातील सहा मोबाइल शॉपी फोडत सुमारे 50 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. लॉकडाऊनमधून आता कुठे व्यापारी नव्या उमेदीने व्यवसायाला लागले असतानाच चोरट्यांनी लुट केल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात चोरट्यांनी पीपीई किट घालून धुमाकूळ घातला आणि वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील 5 मोबाईलची व 1 कॉम्प्युटरचे दुकान फोडून 200 मोबाईलसह सुमारे 50 लाखांचा ऐवज लंपास केला.
दरम्यान, चारचाकी गाडीतून आलेल्या या टोळीतील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या घटनेने कोरोना व लॉकडाऊनमधून सावरत असलेल्या व्यापार्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास 5 जण चारचाकी गाडीतून आले. त्यापैकी 3 जणांनी पीपीई किट परिधान केले होते. दोघांनी एकसारखेच चौकडा शर्ट व पँट परिधान केली होती. सर्व चोरट्यांनी आपले चेहरे पूर्ण झाकून घेतले होते.
In Solapur, six shops were blown up wearing PPE worms; Lampas looted Rs 50 lakh
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज