बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्यातील कोळा येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 11 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
कोळा ता.सांगोला येथील एका महीलेचा दि.11 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पोझिटिवह आला होता.सदर महिला व्यक्तीचे निकट संपर्कात आलेले ( high risk contacts ) कोळा येथील 03 आणि बलवडी येथील 09 अशी एकुण संख्या 12 आहे. त्या 12 व्यक्तींचे कोरोना चाचणी कामी स्वब कोविड केअर सेंटर सांगोला येथे दि.12 जुलै रोजी घेण्यात आलेले होते.
त्यापेकी 11 जणांचे कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झालेले असुन सर्व 11 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. वैदयकीय अधिकारी यांचे सल्यानुसार त्यांना पुढील काळात त्यांना घरी विलगीकरणकक्षात ठेवेणेची कार्यवाही करणेत येणार आहे.उर्वरीत 1 कोळा ता. सांगोला येथील अहवाल प्रतिक्षेत आहेत.
आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज