समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 221 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 293 एवढी झाली आहे तर बाधितांची संख्या 10 10 हजार 248 एवढी झाली आहे.
आज 1 हजार 243 जणांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 1 हजार 62 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 221 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज ‘या’ भागातील दहा जणांचा झाला मृत्यू
मोहोळ तालुक्यातील कोरवलीतील येथील 40 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर येथील 50 वर्षीय महिला, हरिदास वेस, गजानन नगर येथील 60 वर्षांवरील दोघांचा, पुनमिया प्लॉट, नाळे प्लॉट येथील 65 वर्षांवरील दोघांचा, तांबवे, टेंभूर्णी येथील 75 वर्षांवरील दोघांचा आणि बागेचेवाडी, संग्राम नगरातील 65 वर्षांवरील दोघांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.
आज ‘या’ गावात आढळले नवे कोरोनाबाधित
मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव, सांगोला तालुक्यातील धायटी, घेरडी, कोष्टी गल्ली, महूद, नाझरे,माळशिरसमधील अकलूज, आनंदनगर, चाकोरे, चांदापुरी, दसूर, धर्मपुरी, फोंडशिरस, गिरझनी, कन्हेर, माळीगनर, मिरे, कोर्टजवळ, नेवरे, पठाण वस्ती, संग्रामनगर, शिंदेवाडी, श्रीपूर आणि शिक्षक कॉलनी येथे आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.
तर करमाळ्यातील चांदगुडे गल्ली, जिंती, कमलाई नगर, कानड गल्ली, कंदर, माढ्यातील आढेगाव, अरण, कुर्डूवाडी, म्हैसगाव, मिटकळवाडी, मोडनिंब, रांझणी, सुर्ली, तांबवे, टेंभूर्णी, तुळशी, मोहोळ तालुक्यातील आढेगाव, अष्टी, कळसे नगर, मोहोळ स्टेशन, येवती येथेही नव्या रुग्णांची भर पडली आहे.
तर उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, कोंडी, नंदूर, पाकणी, पंढरपुरातील अनवली, भक्ती मार्ग, भोसले चौक, डोंबे गल्ली, जुनी पेठ, कडबे गल्ली, कैकाडी महाराज मठ, करकंब, केसकरवाडी, लिंक रोड, महापौर चाळ, महावीर नगर, रुक्मिणी पटांगण, संभाजी चौक, संत पेठ, सावरकर नगर, दक्षिण सोलापुरातील हत्तूर, होटगी स्टेशन, विडी घरकूल, एनटीपीसी कॉलनी, वांगी,
अक्कलकोट तालुक्यातील किणीवाडी, माणिक पेठ, स्टेशन रोड, वागदरी, बार्शीतील आगळगाव रोड, अलिपूर रोड, जैन मंदिरामागे, गाडेगाव रोड, घोळवेवाडी, गुळपोळी, कासारवाडी, मंगळवार पेठ, नागणे प्लॉट, नवी चाटे गल्ली, रुई, सनगर गल्ली, सौंदरे, उक्कडगाव, उपळाई रोड, वैराग येथे आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Solapur rural corona update
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज