टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहराबरोबर ग्रामीण भागातील ही कोरोनाचा शिरकाव केलेला असून शुक्रवारी माढा तालुक्यात प्रवेश केला होता.तर आज शनिवारी मंद्रूप पोलीस लाईन मध्ये एक पुरुष तर नवीन विडी घरकुल तालुका दक्षिण सोलापूर मध्ये एक पुरुष आणि कवठा तांडा तालुका उत्तर सोलापूर मध्ये एक पुरुष बाधित असे आज तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज एकूण 28 अहवाल प्राप्त झाले असून यापैकी निगेटिव्ह अहवाल 25 आहेत तर पॉझिटिव्ह अहवाल 3 आहेत. आज शनिवारी जिल्ह्यात तीन नवे रुग्ण आढळले आहेत . यामध्ये 3 पुरुषांचा समावेश आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
यामुळे आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 73 इतके झाली आहे. यामध्ये 46 पुरुष तर 27 महिलांचा समावेश आहे.यात एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे. आज पर्यंत एकूण सहा जणांचा बळी या आजारामुळे गेलेला आहे. यामध्ये तीन पुरुष व तीन महिलांचा समावेश होतो सद्यस्थितीत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 61 इतकी आहे.तर बरे होऊन घरी गेलेले सहा जण आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 6 आहे. यामध्ये 5 पुरुष तर 1 महिलेचा समावेश होतो. आजपर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये 3 पुरुष 3 महिलांचा समावेश होतो. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 61 इतकी आहे.यात 38 पूरुष तर 23 महिलांचा समावेश होतो.
Solapur! In rural areas today, three new coronaviruses have been added; At number 73
—————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज