टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोना सोलापूरकरांची पाठ काय सोडत नाही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असून आज सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 49 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या सोमवारी 899 झाली आहे.
आज 49 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर पंढरपूर येथील अनिल नगर येथील 57 वर्षीय पुरुषाचा व उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठाली येथील 67 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ( Solapur rural corona virus update )
सोमवारी ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 211 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 49 पॉझिटिव्ह आहेत तर 162 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 899 झाली आहे.
.
कोरोनामुळे जिल्ह्यात 38 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 368 जण घरी परतले आहेत. 493 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज माळशिरस ,ता.माळशिरस. सिध्दार्थ नगर ,करमाळा . पुजारवाडी ,सांगोला . झेन्डे गल्ली, पंढरपूर तुकाराम भवन, पंढरपूर . रोहिदास चौक, पंढरपूर बेलाटी, ता.उत्तर सोलापूर कोंडी, ता.उत्तर सोलापूर. नान्नज , ता.उत्तर सोलापूर. चिंचोली काटी, ता . मोहोळ . येवती , ता मोहोळ .कासेगाव , ता.दक्षिण सोलापूर कंदलगाव, ता.दक्षिण सोलापूर. वळसंग, ता.दक्षिण सोलापूर . भंडारकवठा, ता.दक्षिण सोलापूर. आहेरवाडी, ता.दक्षिण सोलापूर संजय नगर , अक्कलकोट . खासबाग ,अक्कलकोट . व्हनकळस प्लॉट ,बार्शी . मांगाडे चाळ बार्शी . भवानी पेठ , बार्शी. नाईकवाडी प्लॉट , बार्शी . सुभाष नगर, बार्शी घोडके प्लॉट, बार्शी . कसबा पेठ , बार्शी. माळी गल्ली , बार्शी . रोडगा रस्ता ,बार्शी . आगळगाव रोड , बार्शी . वैराग , ता.बार्शी मुंगशी (आर) , ता.बार्शी . काळेगाव ,ता.बार्शी. सौंदरे, ता.बार्शी. बावी , ता.बार्शी. सासुरे ,ता.बार्शी. घानेगाव, ता.बार्शी असे या भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः
अक्कलकोट 158 , बार्शी 197 , करमाळा 13 , माढा 26, माळशिरस 12 , मंगळवेढा 5 , मोहोळ 48, उत्तर सोलापूर 102 , पंढरपूर 47 , सांगोला 6, दक्षिण सोलापूर 285. असे एकूण 899 रुग्ण
——————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज