समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी कोरोनाने दिलासा दिल्यानंतर आज तब्बल 45 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर आज दोन व्यक्ती मयत झाल्या आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या गुरुवारी 260 झाली असून आज 14 नवे रूग्ण आढळून आले आहेत . यात अक्कलकोट तालुक्यातील 6 तर दक्षिण सोलापूर तालुक्यात 26 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ( Solapur rural corona virus update )
आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 80 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 45 पॉझिटिव्ह आहेत तर 35 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 260 झाली आहे. ( यात एक रूग्ण पुण्यात पॉझिटिव्ह आढळला आहे ).
कोरोनामुळे जिल्ह्यात 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 96 जण घरी परतले आहेत.150 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज हत्तुर , ता.दक्षिण सोलापूर मुळेगाव , ता.दक्षिण सोलापूर हिंगनी निपानी , ता.मोहोळ हिरज , ता.उत्तर सोलापूर पाकनी , ता.उत्तर सोलापूर ति – हे , ता.उत्तर सोलापूर वैराग , ता.बार्शी पारधी वस्ती , मुळेगाव , ता.दक्षिण सोलापूर बोरामणी , ता.दक्षिण सोलापूर कुंभारी , ता.दक्षिण सोलापूर गुरव वाडी , ता . अक्कलकोट . होटकर गल्ली , अक्कलकोट . बुधवार पेठ , अक्कलकोट . नविन पोलिस वसाहत , बार्शी . उपळाई ठोंगे , ता.बार्शी म्हाडा कॉलनी , बार्शी या भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः
अक्कलकोट 46 , बार्शी 39 , करमाळा 1 , माढा 7 , माळशिरस 5 , मोहोळ 14, उत्तर सोलापूर 18 , पंढरपूर 7 , सांगोला 3, दक्षिण सोलापूर 120. असे एकूण 260 रुग्ण
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज